वाहन १०० फुट खोल दरीत कोसळले ; वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल
वाहन १०० फुट खोल दरीत कोसळले ; वनकर्मचाऱ्याचा मृत्यू

म्हसावद | वार्ताहर MHASAVAD

म्हसावद (Mhasavad) रोडवर लेघापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी शंभर फुट खोल दरीत गाडी (accident) कोसळल्याने (Forest Department) वनविभागाच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत म्हसावद (police) पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान निवृती शिवदास पाटील(४४) वनकर्मचारी कार्यालय तोरणमाळ (ह.मु.श्रीहरीनगर,कांकरीया भवनमागे देवपूर धुळे) हा सरकारी टपाल देण्याकामी राणीपूर येथे स्वतःच्या गाडी (क्र.एम.एच.०१ सी.व्ही.४०३१) ने येत असताना लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटात अचानक गुरे आडवे आले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी १०० फुट खोल दरीत कोसळल्याने तोंडाला, डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वनपाल संजय हिरामण पवार(४५) तोरणमाळ यांनी म्हसावद पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com