मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेला शहीद शिरीषकुमार यांचे नाव द्यावे : भाजप

मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेला शहीद शिरीषकुमार यांचे नाव द्यावे :  भाजप

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्याकडे उड्डाणपूल बांधण्यात यावा, मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेला शहीद शिरीषकुमार given name Shirish Kumar यांचे नाव देण्यात यावे , यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपच्या bjp वतीने केंद्राच्या रेल्वे मंडळाच्या Railway Board's प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांना देण्यात आले .

भारतीय रेल्वे मंडळाच्या प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांचे नंदुरबार येथे आगमन झाले . या वेळी याकमिटीचे प्रमुख डॉ.राजेंद्र फडके , छोटूभाई पाटील , कैलाश वर्मा , गिरीश राजगोर , विभा अवस्थी यांचे स्वागत भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे रेल्वेच्या विविध समस्यांबाबत निवेदनदेखील देण्यात आले.

या वेळी खा. डॉ. हीना गावित, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , भटके - विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शाह, प्रा.पंकज पाठक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी, सुनील वाघरी आदी उपस्थित होते. सिंधी कॉलनीकडे मोठी वस्ती झाल्याने या भागात जाण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा. तसेच आरक्षित व अनारक्षित तिकीट खिडकी या भागात उभारण्यात यावी , संपूर्ण रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे , अशीही मागणी करण्यात आली .

रेल्वे स्टेशनच्या काही भागात शेड नाही . त्यामुळे पूर्ण स्थानकावर कव्हरशेड उभारण्यात यावा, नंदुरबार- पुणे ही प्रवासी गाडी लवकर सुरू करण्यात यावी , मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात यावे, दिव्यांग - व्यक्तींसाठी बॅटरीवर चालणार्‍या गाड्यांची सुविधा करण्यात यावी, प्रवाशांना थांबण्यासाठी एका रूमची- व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com