वर्षातून फक्त कार्तिकी पौर्णिमेलाच उघडते हे मंदिर

प्रकाशा येथील कार्तिकी स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी
वर्षातून फक्त कार्तिकी पौर्णिमेलाच उघडते हे मंदिर

प्रकाशा | वार्ताहर- PRAKASHA

वर्षातून केवळ कार्तिकी पौर्णिमेला (Karthiki Pournima) उघडणार्‍या दक्षिणकाशी (South Kashi) येथील कार्तिकी स्वामी मंदिरात (Karthiki Swami Temple)आज भाविकांनी दर्शनासाठी (darshan) मोठी गर्दी (Large crowd) केली होती. काल दुपारी १२ वाजेपासून उघडलेले हे मंदिर रात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याने कालपासून मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आले.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रकाशा ता.शहादा येथे विविध देवीदेवतांची शेकडो मंदिरे आहेत. भारतातील काही मोजक्याच ठिकाणी कार्तिकी स्वामींचे मंदिर आहे. ते प्रकाशा येथेही आहे.

सदर मंदिर प्राचीन कलात्मक पाषाणयुक्त मजबूत बांधकाम केलेले असे आहे. तापीनदीच्या किनार्‍यावर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर उभारण्यात आले आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला केवळ एका दिवसासाठी हे मंदिर उघडण्यात येते.

त्यानुसार काल दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या मुहूर्तावर मंदिरट्रस्टीचे कार्याध्यक्ष रमेश ठाकरे यांच्या हस्ते बंद मंदिराचे बंद कुलूप उघडण्यात आले. मंदिर उघडल्यानंतर मंदिरात ट्रस्टींनी शंकर महादेव, पार्वती, कार्तिक स्वामी, गणेशजींची पूजा अर्चा केली.

मंदिरप्रांगणात होम हवन कुंडची मानकरी राजेंद्र मिस्त्री यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आली. यावेळी ट्रस्ट पदाधिकारी कैलास ठाकरे, दिलीप ठाकरे, कल्पेश सोनार, पोलीस जमादार सुनील पाडवी, पोलीस वळवी, रमेश माळीच, पिंट्या भिल, गणू भिल, अरुण मट्या भिल,

राजेंद्र पांडुरंग मिस्त्री, विनोद ढाकणे, मंदिर पुजारी आदी उपस्थित होते. कालपासून या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. महिला भाविकांची उपस्थिती मोठया प्रमाणावर होती. भाविकांनी कार्तिक स्वामीचा मूर्तीवर फक्त मोरपीस चढवून आटोपशिर पूजा विधी केली. आजदेखील दिवसभर मंदिरात भाविकांनी मोठया प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com