शेंदुरी-मणिबेली रस्त्यावर दरड कोसळली

नर्मदा काठावरील गमण रस्त्याचा भाग खचल्याने ग्रामस्थांना पंधरा किमीची पायपीट, पंचनामे करण्याची मागणी
शेंदुरी-मणिबेली रस्त्यावर दरड कोसळली

मोलगी Molgi । वार्ताहर -

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील दुर्गम भागालाही मुसळदार पावसाचा फटका (Heavy rain) तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते गमण दरम्यान वळण रस्त्यावर (winding road) दरड कोसळली (crack collapsed). त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे डोंगराळ भागात पिंपळखुटा फाटा ते गमण दरड कोसळली. आवलीफाटा, चिखनीपाडा, छापरीउंबर, रोहय्याबारी, कोराई, दराबारी, मोगरीबारी, जांगठी, शेंदुरी, सिपान, मणिबेली त्यामुळे या अनेक मोठी मुख्य गावे मोलगी, अक्कलकुवा तालुक्याच्या बाजारपेठेत येण्यासाठी याच रस्त्याचा अवलंब करतात. मात्र रस्त्यावर दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जेमतेम दुचाकीस्वार वाहने निघू शकतात. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन या परिसरातील रस्त्यावर कोसळलेली दरड हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित विभागाने देखील दूर्लक्ष करीत असल्याने चित्र आहे. प्रशासनाने वेळीच पाहणी करुन दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडुन होत आहे.

पंधरा किमीची पायपीट

अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावर असलेल्या गमण रस्त्यावर रस्त्याचा भाग खचून वाहुन गेल्याने गमणसह, बामणी, सिंदुरी, जांगठी, चिमलखेडी, डनेल परिसरातील गाव पाड्यावरील नागरिकांना गैरसोयीचे व त्रासदायक होवून पंधरा ते किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.अककलकुवा तालुक्यात डोंगर माथ्यावर गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरील पाणी रस्त्यावर येऊन रस्तांचा भाग खचून कोराईपाडाजवळ रस्ताच वाहुन गेल्याने देवबारा देवस्थान जवळ, चिकणीपाडा, कोराईपाडा रस्त्यावर मातीच्या मलबा व ढिगारे पडून रस्ता बंद पडल्यानेनर्मदा किनारच्या गमण, बामणी, सिंदुरी, डनेल, जांगठी, चिमलखेडी, मोगराबारीपाडा, दोराबारीपाडा, विडीपाडा, पिपलापाडा, पाटीलपाडा डुरापाडा, खालपाडा, हाकडीपाडा, आरावापाडा, बुभापाडा, कोरडीडोंगर, पन्नालपाडा या गाव पाड्यांवरील नागरीकांना रस्ता बंद पडल्याने गैरसोयीचे व त्रासदायक होवुन पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करीत ये जा करावे लागत आहे.

पंचनामे करण्याची मागणी

गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात नदीनाल्यांना पूर येऊन व डोंगरावरून पाण्यासह माती वाहुन येऊन शेतकर्‍यांच्या पिकांचे, घरातील जीवनावश्यक वस्तूंचे, पशुहानी होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर येऊन घरांची पडझड होवून जीवनावश्यक वस्तूंचे तसेच पशुपालकांचे पशु वाहुन गेल्याने व डोंगरावरून मातीच्या मलबासह वाहुन आलेल्या नदीच्या पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय मदतीसह नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्री.पाडवी यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com