मेंढयांचा वाडा खाली करण्याच्या कारणातून दोन गटात वाद

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा
मेंढयांचा वाडा खाली करण्याच्या कारणातून दोन गटात वाद

नंदुरबार NANDURBAR । प्रतिनिधी

मेंढयांचा वाडा (sheepfold) खाली करण्याच्या कारणातून दोन गटात वाद(Argument) उफाळून आला. यावेळी दोन्ही गटातील लोकांमध्ये हाणामारी (Fighting) झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना नागझिरी (Nagziri) येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून सात जणांविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस (Nandurbar Taluka Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारात नागझिरी येथे मेंढयांचा वाडा आहे. हा वाडाखाली व मेंढीचे पिल्ले पकडण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले असून दोन जखमी झाले आहेत. पहिली फिर्याद दिलीप मयाराम ठेलारी यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, वाडा खाली करण्याच्या कारणातून बालु चिंधा ठेलारी याने लाकडी डेंगार्‍याने डोक्यावर मारहाण करून दिलीप ठेलारी यांना जखमी केले आहे

तर उर्वरीत दोघांनी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बालु चिंधा ठेलारी, देवा चिंधा ठेलारी, खुटया चिंधा ठेलारी या तिघांविरूध्द भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अ ाला आहे. पुढील तपास हे.कॉ. देविदास नाईक करीत आहेत. तसेच दुसरी परस्परविरोधी फिर्याद भावेश चिंधा ठेलारी यांनी दिली आहे.

त्यात म्हटले आहे की, मेंढीचे कोकरू पकडण्याच्या कारणातून संशयीत चौघांनी हामाबुक्यांनी मारहाण करीत भावेश ठेलारी यांचे काठीने डोके फोडले तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांचा भाऊ देवा ठेलारी यास हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कंगा भिवा ठेलारी, मंगा गरीबा ठेलारी या चौघांविरूध्द भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गुलाब तेले करीत आहेत.

Related Stories

No stories found.