स्कुटी खड्डयात पडली आणि ट्रकने चिरडले

एक जागीच ठार, नंदुरबार शहरातील घटना
स्कुटी खड्डयात पडली आणि ट्रकने चिरडले

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी -

तालुक्यातील भोणे (Bhōṇē) येथे नातेवाईकांना घेण्यासाठी जात असणारी दुचाकी (Two-wheeler) खड्डयात (In the pit) पडली. त्याचवेळी समोरुन येणार्‍या ट्रकने (truck) (Crushed) चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील चिंचवार येथील चंद्रकांत उत्तम माळी (36, रा.जगताप वाडी, नंदुरबार) हे दोन वर्षांपासून नंदुरबारात भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी आले होते. त्यांचे नातेवाईक भोणे येथे शिक्षक आहेत.

त्यांना घेण्यासाठी ते स्कुटी (क्र.एमएच 39 पी 3948) ने भोणेकडे शहादा बायपास रस्त्याने जात होते. यावेळी बायपास रोडवरील व्ही.जी.राजपूत लॉन्सजवळील एका खड्डयात स्कूटीचे चाक आल्याने गाडी पडली. त्याचवेळी समोरुन येणार्‍या ट्रक (क्र.एमएच 30 एबी 3130) च्या चाकाखाली दुचाकी आल्याने दुचाकीवरील चंद्रकांत माळी ट्रकच्या चाकाखाली जागीच ठार झाले.

स्कुटीचा पूर्णतः भुगा झाला आहे. सायंकाळी 4.50 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. अपघात घडल्याचे समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी मदत कार्य केले. याबाबत रात्री उशिराने कल्पेश भास्कर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com