तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागाला गॅस शेगडीची प्रतिक्षाच!

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागाला गॅस शेगडीची प्रतिक्षाच!

मंगेश पाटील

बोरद । Bored

एकिकडे उज्वला गॅस योजना (Ujjwala Gas Scheme) राबविली जात असतांना तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील (rural areas) विशेषतः बोरद परिसरातील मोड, बोरद, करडे, लाखापुर, मालदा आदी गावातील नागरिकांनी गॅस एजन्सीकडे (Gas Agency) नोंदणी करून सहा महिने झाले. तरी अद्यापपर्यंत शेगडी वाटप (Distribution of grates) करण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून सरकार दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना घरगुती गॅस शेगडी कनेक्शन वितरित करीत असते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे आर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबांना विशेष करून गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना 1 मे 1996 रोजी उत्तर प्रदेशातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी सुरू करण्यात आली होती. ही योजना केंद्र सरकारच्या मोहिमेखाली असलेल्या नैसर्गिक वायू संसाधन मंत्रालयाच्या संदर्भातून चालविली जात आहे.

ग्रामीण भागातील अजूनही स्वयंपाक करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने लाकडे, शेणापासून तयार केलेल्या गोवर्‍या त्याचबरोबर झाडांची पाने व गवताचाही वापर करीत असतात. यातून निघणार्‍या धुरामुळे गरिबांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

यासाठी नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन जोडले गेले आहेत. उर्वरित महिलांची नोंदणी करून चार ते पाच महिने होत आले आहेत. मात्र, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा मिळावा यासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर गॅस शेगडी वाटप करण्यात यावे अशी मागणी बोरद परिसरातून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील महिला तळोदा येथील गॅस एजन्सी कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत. त्यावेळी योजनेचा लाभ कधी मिळेल असे विचारल्यास कार्यालयाकडून उत्तर देण्यात येते की लवकरच देण्यात येईल, मेळावा घेऊ त्यावेळी सगळ्यांना वाटप करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात केव्हा गॅस वाटप होईल, याची वाट लाभार्थी पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com