बिलाडी परिसरात नियमबाह्य खडी क्रशरांचा सुळसुळाट

गौण खनिजांचा बेसुमार उपसा
बिलाडी परिसरात नियमबाह्य खडी क्रशरांचा सुळसुळाट

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-

शहादा तालुक्यातील बिलाडी, वरूळ, कानडी, सोनवद, पुसनद शिवारात शासनाचे नियम (Rules of government) धाब्यावर बसवून खडी क्रशर (Vertical crusher) सुरु आहेत. या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून येत असतांनाही महसूल विभागाने (Revenue Department) याकडे दुर्लक्ष केले आहे. तालुक्यात पर्यावरण विभाग (Department of Environment) तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळून खडी क्रेशर चालवणार्‍यांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.

दगड खदान उपसा बेसूमार केला जात आहे. कधी अवैध वाळू उपसा तर कधी खदानीतील मुरुम उपसून पर्यावरणाला (environment) फाटा देत राजरोसपणे खडी क्रेशर सुरू आहेत. याबाबत संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहादा तालुक्यातील वरुळ, कानडी, सोनवद, पुसनद शिवारात गेल्या अनेक वर्षापासून स्टोन क्रशर ( दगडखाणी ) सुरू आहेत . या ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरु आहे . महराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैध प्रमाणपत्राशिवाय सुरु आहेत .

यात बर्‍याच त्रुटी गंभीर स्वरुपाच्या असल्याचे समजते . क्रशर प्लान्ट , कन्वेअर बेल्ट योग्यरित्या पत्रे लाऊन बंदिस्त केलेले नसल्याने येथे मोठया प्रमाणावर धुळीचे उत्सर्जन होत आहे . पाणी फवारणी यंत्रणा व फोगर यंत्रणा बसवलेली नाही .

क्रशर परीसरात पक्का रस्ता करण्यात आलेला नाही . क्रशर भोवती हवा प्रतिबंधक भिंत उभारली नाही या क्रशरच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर धूळ निर्माण होत असून हवेचे प्रदूषण होत आहे . या क्रशर लगत असलेल्या शेतजमिनीचा मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे .

प्रत्यक्षात ही स्टोन क्रशर शासन नियम आणि अटी व शर्तीचे पूर्णपणे उल्लंघन करुन सुरु आहेत . महसुलच्या रेकॉर्ड नुसार बंद असलेल्या व प्रत्यक्षात सुरु असलेल्या स्टोन क्रशरनी आज पर्यंत केलेल्या उत्खननाची मोजणी करुन शासनाच्या नियमाप्रमाणे दंड आकारणी करावी . या सर्व बाबींकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com