आदिवासी जीवन पद्धतीत निसर्ग वाचवण्याची ताकद!

कुंडल येथे पार पडली तीन राज्यांची आदिवासी महापंचायत
आदिवासी जीवन पद्धतीत निसर्ग वाचवण्याची ताकद!

रविंद्र वळवी

मोलगी । Molgi

आदिवासी बांधव (Tribal brothers) प्रकृतीचे केवळ पूजनच करत नाही, तर वर्षानुवर्षे तिचे जतनही करीत आला आहे. नैसर्गिक साधनांचा उपभोग घेणारा परंतु निसर्गाला किंचीतही धोका (slightest threat to nature) न पोहोचणारा आदिवासी जल-जंगलाच्या (water-forest) सानिध्यातच आपले जीवनगाणे गात (Sing the song of life) आला. निसर्गाशी एकरूप झालेल्या या समाजाने घरांची बांधणी, वाद्ये व भांडीही पर्यावरणपूरकच (Eco-friendly) निर्माण केली. म्हणून या जीवनशैलीत (tribal way of life) (संस्कृतीत) निसर्ग वाचविण्याची (power to save nature) ताकद आहे, असा सूर कुंडल (ता.धडगाव) येथे पार पडलेल्या दुसर्‍या सातपुडा आदिवासी महापंचायतीत (second Satpuda Tribal Mahapanchayat) उमटला.

या पंचायतीत आदिवासी एकता परिषदेचे (Tribal Unity Council) महासचिव अशोक चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगर बागुल, चळवळकर्ते सांगल्या वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनावणे, राजू पांढरा (पालघर), व्याराचे माजी खा.अमरसिंग चौधरी, लालसिंग गामीत, गुजरातचे साहित्यिक डॉ.जितेंद्र वसावा, माजी आ.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त शिवलाल वळवी, गटनेते सी.के.पाडवी, आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव डॉ.सुनिल पर्‍हाड (पालघर), वेणीलाल वसावा, माजी राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, करण सोनवणे (जळगाव), कैलास पवार (नाशिक), भगवान वळवी (धुळे), डॉ.महेश मोरे, सिताराम राऊत, करमसिंग पाडवी, अ‍ॅड.अभिजीत वसावे, पाच्या पाडवी, धिरसिंग वळवी, जयसिंग वळवी, कुलदीप पाडवी, मावीमच्या अलका पाडवी, सुरेखा गावीत, रमिला वसावे आदी उपस्थित होते.

यावेळी अशोक चौधरी (Ashok Chaudhary)यांनी कोणी काय केले हे पाहण्यापेक्षा आपण काय करणार हे ठरवूया, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगल्या वळवी यांनी बालपणापासूनच मुलांना निसर्ग संवर्धनाची जाणीव करुन दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अ‍ॅड. सीमा वळवी यांनी दहेजची वाढती रक्कम (Increasing amount of dowry) नियंत्रणात आणता नवसमाज उभारावा असे मत व्यक्त केले. राजू पांढरा यांनी जागतिक तापमान वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. डोंगर बागुल यांनी आदिवासी परंपरा व त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.महेश मोरे व भूदान चळवळीतील बाबा वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य राकेश वळवी, पाडवी रवींद्र गुरुजी, मांगीलाल पाडवी, योगेश पाडवी, दारासिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी, विनोद पाडवी यांनी परिश्रम घेतले.

आधुनिक साधने सभ्य संस्कृतीला धोका

आदिवासी वैज्ञानिकांनी निर्माण केलेल्या वाद्यांचा मानवी जीवन व पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. ही वाद्ये आधुनिक वाद्यांमुळे कालबाह्य होऊ लागली. तसे आधुनिक साधनांमुळे संवाद तुटत (Modern tools disrupt communication) चालल्याचे म्हणत माजी आ.पद्माकर वळवी यांनी सांस्कृतिक धोका वर्तवला.

निसर्ग संवर्धन आदिवासींचीच जबाबदारी नाही

निसर्ग संवर्धन(Nature conservation) ही फक्त आदिवासीचीच जिम्मेदारी आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी उपस्थित केला. झाड लावण्यासाठी प्रत्येक समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. पूर्वी पहाडात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचे स्वागत सातपुडा घनदाट जंगलाच्या माध्यमातून करत होता. अशा या वैभवशाली सातपुड्यात आज व्यावसायिक बुद्धीचा शिरकाव झाला त्यामुळे ओसाड परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही श्री.सोनवणे यांनी सांगितले.

सरकार व योजना आदिवासींना वाचवणारा नाही

आदिवासी समाज वाचवण्यासाठी केवळ स्वावलंबी जीवन व आदिवासी मूल्यांचा अवलंब करावा. जंगल वाढवले तर आज रोजगारासाठी भटकणारे सातपुडावासी इतरांना रोजगार देणारे बनतील. संस्कृती व परंपरा ही प्रत्यक्ष जगणे शिकवते. पुस्तकी परंपरा काही कामाच्या नाही, संस्कृती टिकवणे (Sustaining the culture) ही प्रत्येक आदिवासी बांधवांची जबाबदारी आहे, असेही डॉ.पर्‍हाड यांनी सांगितले.

आदिवासींमध्ये 122 रानभाज्या

आज आदिवासी 122 रानभाज्यांचा (vegetables) आपल्या आहारात उपयोग करीत आहे. या भाज्या आत्मबळ व रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी असल्याचे म्हणत सी. के.पाडवी यांनी या भाज्या कायम मिळाव्या म्हणून प्रत्येकांनी झाडे लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

बांबू बियाणे वाटप

बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सीमा वळवी यांनी महापंचायतीत उपस्थित आदिवासी बांधवांना बांबू बियाणे (Distribution of bamboo seeds) वाटप केले. यामुळे आदिवासींना जीवनावश्यक अशा बांबू नव निर्मितीस हातभार लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com