दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब रस्त्याची दुर्दशाच

उपाययोजनेअभावी दुर्घटना झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच

मोलगी । molagi। वार्ताहर

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील आमलीबारी ते दाब दरम्यानच्या (Amlibari to pressure) चढ-उतार असलेल्या डोंगर उतारावरील वळण रस्त्यावर (winding road) गेल्या काही दिवसापासून ठिकठिकाणी दरड (collapse of the crack) कोसळल्याने वाहतुकीस अडथळा (Traffic obstruction) निर्माण झाला आहे. परिणामी अपघातास (accident) आमंत्रण देणार्‍या या रस्त्यावर वाहनधारक (vehicle owner) धोका (risk) पत्करून वाहन चालवीत (Driving a vehicle) आहेत. यातून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता असून हलगर्जीपणामुळे व उपाययोजनेअभावी दुर्घटना झाल्यास, त्या घटनेस प्रशासनाला (administration) जबाबदार धरण्याच्या व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या इशारा प्रवासी, वाहनधारक (Passengers, vehicle owners) व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच
विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकास हेच ध्येय : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी ते दाब दरम्यानच्या घाट रस्त्याचे नुकतेच दुपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चढ-उतार असलेल्या डोंगर उतारावर ठिकठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करण्याकामी डोंगर खोदण्यात आल्याने वनस्पती, झाडे, झुडपे या नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच
जिल्हयातील ५४१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन
दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच
VISUAL STORY : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं झालं बारसं

माती, दगड गोटे काढल्याने जमिनीत पडलेल्या भेगेमुळे तेथील भाग कमकुवत पडणे तसेच डोंगर उतारावरील पायथ्यालगत असलेल्या झाडांची मुळे उघडी पडणे आदी कारणास्तव भूस्खलन प्रवण प्रदेश निर्माण झाला आहे.

दरम्यान, रस्ता रुंदी करणतांना संरक्षणात्मक जाळीअभावी दरड कोसळण्यास कारणीभूत ठरले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना झाल्या नसल्याने वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....
दरड कोसळलेल्या आमलीबारी-दाब  रस्त्याची दुर्दशाच
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

कृत्रिम आपत्ती पोषक परिस्थिती निर्माण होऊनदेखील सबंधित विभागाकडून वेळोवेळी हलगर्जीपणा व दुर्लक्ष होत असल्याने काही दिवसांपासून ठिकठिकाणी दरड कोसळूनदेखील रस्ता वाहतुकीस मोकळा न झाल्याने अपघात घडण्याचा धोका वाढला आहे. परिणामी वाहनचालक धोका पत्करून वाहन काढीत असल्याने मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता असल्याने उपाययोजना अभावी दुर्घटना झाल्यास, त्या घटनेस प्रशासनास जबाबदार धरण्याच्या व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या इशारा प्रवासी, वाहनधारक व सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com