वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली वैद्यकीय अधिक्षकांनाच मारहाण

तळोदा उपजिल्हा रूग्णालयातील घटना
वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली वैद्यकीय अधिक्षकांनाच मारहाण

मोदलपाडा Modalpada ता.तळोदा वार्ताहर

तळोदा (Taloda) येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (medical officers) १ डिसेंबर रोजी रात्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाच (Medical Superintendent) धक्काबुक्की करून मारहाण (Pushing and beating) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णालयातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी दारूच्या (On duty medical officer drunk) नशेत कर्तव्यावर का आले अशी विचारणा वैद्यकीय अधीक्षकांनी केल्याने त्याचा राग येऊन धक्काबुक्की झाल्याचे पोलीस ठाण्यात (police station) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने वरिष्ठांनी लक्ष द्यावे व या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला आहे.त्यात म्हटले आहे की १ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास ठाकरे यांना आपण कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत का आले अशी विचारणा केली. डॉ.ठाकरे यांना याचा राग येऊन त्यांच्यासोबत असलेले दुसरे डॉ.गणेश पवार या दोघांनी मिळून वैद्यकीय अधीक्षक गायकवाड यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली वैद्यकीय अधिक्षकांनाच मारहाण
VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

दरम्यान रात्रीच वैद्यकीय अधीक्षक गायकवाड यांनी सिव्हिल सर्जन नंदुरबार यांच्याकडे या प्रकरणाची माहिती दिली असल्याचे त्यांनी देशदूत शी बोलताना सांगितले. त्यामुळे येथील रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी रुग्णांनी व नातेवाईकांनी केली आहे.

ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्याला मी दारूच्या नशेत का आल्याचे विचारल्याने त्याचा राग येऊन मला धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. त्यामुळे मी पोलीस स्टेशन येथे नोंद केली आहे.

डॉ. प्रफुल्ल गायकवाड वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तळोदा

घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

डॉ.चारुदत्त शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com