ग्लोबल पुरस्कार प्राप्त काल्लेखेतपाडा जि.प.च्या विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास

शिक्षणासाठी दोरीच्या सहाय्याने पुरातुन करावा लागतेय नदी पार
ग्लोबल पुरस्कार प्राप्त काल्लेखेतपाडा जि.प.च्या विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास

मोलगी Molgi ता.अक्कलकुवा । वार्ताहर

गेल्या तीन चार दिवसापासून सातपुड्यात मुसळधार पाऊस (Heavy rain in Satpura) झाल्याने सर्व नदी नाल्यांना पूर (Flooding of rivers) आला आहे. रस्तापूल (No road bridge) नसलेल्या अनेक गावांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागले. शनिवारी अशाच परिस्थितीचा फटका धडगांव तालुक्यातील काल्लेखेतपाडा शाळेला (Kallekhetpada School) बसला. या पाड्याला उमराणीपासून पक्का रस्ता, पूल नसल्याने (no paved road, bridge) जि.प प्राथमिक शाळेतील (District Primary School) विद्यार्थ्यांना (students) शाळा सुटल्यानंतर पुराच्या पाण्यातुन नदीपार (River crossing through flood water) करतांना गावकर्‍यांच्या मदतीने दोरीच्या (With a rope) सहाय्याने जीव मुठीत घेऊन प्रवास कराव लागला.विषेश म्हणजे काल्लेखेतपाडा शाळा ही ग्लोबल पुरस्कार (Global Award) प्राप्त ठरलेली शाळा आहे.

धडगांव तालुक्यातील काल्लेखेतपाडा शाळा ही सहा खंडातील हजारो शाळांमधून जगातील शंभर शाळांमधली ग्लोबल पुरस्कार प्राप्त ठरलेली असून सावरीपाडा, देवपाडा,मोवाडीपाडा,होळीपाडा,ओवायापाडा,पाटीलपाडा, निलरीपाडा,खालचापाडा,व बारीपाडा,आमला,बिलान बारीपाडा,कुंडाईपाडा अश्या पाड्यातुन साठ ते सत्तर विद्यार्थी दोन ते चार किलोमीटर पायवाटेने काल्लेखेतच्या जिल्हा परिषद शाळेत जात असताना त्यांना वाटेत लागणार्‍या एकच नदिचे नाले सात आठ ठिकाणी लागत असल्याने पावसाळ्यात नदि नाल्यांतुन यावे जावे लागते.

कधी कधी जास्त पाऊस राहीला तर दोरखंडाच्या सहाय्याने तरूण व पालक वर्ग काढत असतात मात्र एखाद्या वेळी ही शालेय विद्यार्थी नदि नाल्यांतुन निघत असताना अचानक पाणी वाढुन या शालेय विद्यार्थ्यांना धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे यामार्गावरील नदि नाल्यांवर पुल बांधणे गरजेचे झाले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून शाळेजवळ नदीनाल्यावरचा पूलसाठी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने विध्यार्थी पालक -ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत असून गार्‍हाणे मांडायचे कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.

या शाळेत शिक्षणासाठी येणारी मुलेअवयापाडा,होळीपाडा,सावर्‍या पाडा,बारीपाड्यातून आदी पाड्यातून येत असतात.नदी नाल्यांवर पूल नसल्याने,पावसाळ्यात नदीनाल्यारना पूराचे पाणी राहत असल्याने जीव मुठीत घेऊन मुलांना शाळेत पाठवावे लागते.तरी प्रशासनाने पूल बांधणे गरजचे आहे.

काल्लेखेतपाडा ग्रामस्थ.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com