नवापूरातील रंगावली नदीची पातळीही वाढली

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी घेतला आढावा
नवापूरातील रंगावली नदीची पातळीही वाढली

नवापूर Navapur। श.प्र.-

तालुक्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Rains disrupt public life) झाले आहे. गुजरात राज्यात जोरदार अतीवृष्टी (Heavy rains in Gujarat) होत असल्याने तालुक्यातील वाहणार्‍या रंगावली नदीच्या पाण्याची पातळी (Rangavali river water level) वाढली असून पुराचा फटका (blow of the flood) बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी (Safe places for citizens) हलविण्यात आले आहे. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी प्रत्यक्ष भेट देवून पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

नवापूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून काल तालुक्यात 101 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गुजरातच्या डांग परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रंगावली नदीच्या पाण्याने पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रंगावली नदीचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व नवापूर शहरातील नदी काठावरच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता लक्षात घेत. प्रशासन तयारीला लागले असून नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

जिल्ह्यात पुढील 72 तासात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी कुठेही जाऊ नये तसेच नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी मिनल करणवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया, मुख्यधिकारी सप्नील मुंदलवाडकर, माजी नगरसेवक अजय पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक प्रविन कोळी, न.पा प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, सतिष बागुल, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश येवले आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी खत्री यांनी रंगावली नदीची पाहणी केली. त्यानंतर अग्रवाल भवन, टाऊन हॉल यांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना वेळोवेळी परीस्थीतीचा आढावा घेेण्याच्या सुचना दिल्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com