सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओतील महिला मनोरुग्ण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओतील महिला मनोरुग्ण

अंनिसने उघडकीस आणले महिलेचे सत्य

मोलगी | वार्ताहर- MOLAGI

डाकीण (Witch) ठरवून महिलेला निर्वस्त्र करुन छळ होत (Persecution) असलेला सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओतील (video) महिला (woman) ही मनोरुग्ण (Psychiatric) असून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील पानसेमल तालुक्यातील बायगोर या गावातील रहिवासी असल्याचे सत्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Anti-Superstition Committee) उघडकीस आणले आहे.

सदर महिला महाराष्ट्राच्या सीमेलगत पानसेमल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बायगोर गावातली आहे. गावातील काही लोकांनी (People) तिला डाकीण (witch) ठरवून अंगावर चटके देण्याची शिक्षा (Punishment) दिली होती.

सदर व्हिडिओ (video) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर महिला तीस वर्षाची विवाहित तरुणी असून गेली बारा वर्ष मनोरुग्ण अवस्थेत (psychotic state) गावातच हिंडत आहे. नग्नावस्थेत चटक्यांची शिक्षा देऊनही सदर प्रकरण गावातच जातपंचायतीने (Jat Panchayat) मिटवण्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Anti-Superstition Committee) पथकाने सदर गावाचा शोध लावून प्रत्यक्ष महिलेची भेट (woman's gift) घेतली. महिला आणि तिचे कुटुंब अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत असून, म्हातारे आई वडील व लहान भाऊ असा छोटा परिवार आहे.

मजुरी करून जीवन जगणार्‍या या कुटुंबात सदर महिला बारा वर्षापासून मनोरुग्ण या अवस्थेत आहे. अंधश्रद्धेच्या (superstition) पायी कुटुंबाने सदर महिलेला अनेक बुवा-बाबा मांत्रिक यांच्याकडे फिरवत उपचार करण्याचा प्रयत्न केला. काही हजार रुपये खर्च करूनही उपचार न झाल्याने (Without treatment) सदर महिला आजही मनोरुग्ण अवस्थेत आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन सदर कुटुंबाला आधार दिला आणि मानसिक उपचारासाठी मदतीची ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सदर तक्रार मध्यप्रदेश प्रशासनापर्यंत पोहोचून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत संघटना प्रयत्न करणार आहे.

तेथील प्रशासनाच्या सहकार्याने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाचे मोहीम सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. या पथकामध्ये महाराष्ट्र आणि अक्कलकुवा शाखा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे, शहादा कार्यकर्ते के आर पाडवी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि आडगाव चे पोलीस पाटील गौतम खर्डे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.