तिनसमाळ ग्रामस्थांचे उपोषण दहाव्या दिवशी मागे

पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचे आश्वासन
 तिनसमाळ ग्रामस्थांचे उपोषण दहाव्या दिवशी मागे

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

तिनसमाळ गावाचे (Tinsamal village) पूनर्वसन (Rehabilitation) तसेच विविध सुविधा (Convenience) उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन (Written assurance) पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी (Guardian Minister Adv. KC Padvi) यांनी दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले ग्रामस्थांचे (villagers) उपोषण (Fasting) मागे घेण्यात आले.

नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसर्‍या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले तिनसमाळ गाव (Tinsamal village) गावात कोणतीही मूलभूत सुविधा (Infrastructure) नाही, पिण्याचा पाण्याची सोय नाही, रस्ता कच्चा आणि कागदावर पूर्ण अश्या करणांमुळे दि. 2 एप्रिल 2022 रोजी तिनसमाळ ग्रामस्थ व शेलदा ग्रामस्थ मिळून तिनसमाळ येथे आमरण उपोषणास (fast unto death) बसले होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण पालकमंत्री .के.सी.पाडवी (Guardian Minister Adv. KC Padvi) यांच्या आश्वासनानंतर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले.

सातपुडा दुर्गम भागातील तिनसमाळ ग्रामस्थ मूलभूत सुविधा तसेच गावाचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून गावातच आमरण उपोषण सुरू बसले होते. अखेर जिल्हाधिकारी (Collector) व पालकमंत्री.के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी ग्रामस्थांना गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न तसेच सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तानाजी पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. याबाबत पालक मंत्री के सी पाडवी यांनीही गावाचे पुनर्वसन व विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.