चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर

नवापूर । Navapur। श.प्र.

नवापुर ते कोळदा बस वेळेवर येत नाही.ठरलेल्या वेळापत्रकानुसार बसस्थानकात बस उपलब्ध राहत नाही.वेळापत्रकानुसार बस वेळेवर सोडावी या मागणीचे निवेदन दिले. दरम्यान बसेसची वेळेबाबात कर्मचारी व अधिकारी यांच्याशी विचारपुस केली असता बसस्थानाचा चौकशी वार्ड मधुन आम्हास उडावाउडवीचे उत्तरे देण्यात येतात, तसेच चालकाविषयी विचारणा केली असता चालका दारु पिऊन झोपला आहे असे उत्तरे आम्हास मिळत असल्याने संतप्त ग्रामस्थांतर्फे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर
उद्योजक बच्छावांकडील दरोड्याचा असा झाला उलगडा :हॉटेल व्यवसायात कर्जबाजारी झाल्यामुळे टाकला दरोडा

कोळद्याचे सरपंच तेजस वसावे व गावातील विद्यार्थ्यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना संतप्त प्रतिक्रीया देत निवेदन दिले त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर मार्फत नवापुर कोळदाचे सर्व बसेस आमच्या गावाला वेळेवर येत नाही, नवापुर ला देखील ठरवलेला वेळापत्रकानुसार बस बसस्थानकात उपलब्ध राहत नाही.

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर
Breaking # जळगाव महापालिकेत भाजपला धक्का : गटनेते भगत बालाणीचे नगरसेवक पद धोक्यात

यामुळे आम्हास आमच्या शासकीय कामात संबधीत कार्यालयात हजर राहणे मिटींग मध्ये हजर राहणे जमत नाही, त्यामुळे आमचे नुकसान होत आहे. तसेच गावातील विद्यार्थांना वेळेवर बस भेटत नसल्याने ते शाळेत वेळवर हजर राहणे शक्य होत नाही, सदरचा भोंगळ कारभार काही वर्षापासुन चालु आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांच्या कार्यालयात वारंवार निवेदन ही देण्यात आलेले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांच्या कार्यालयाकडुन कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर
विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी २४ नोव्हेंबरपासून मोलगी येथे बेमुदत रास्तारोको
चालक दारू पिवुन झोपल्यामुळे बसला होतो उशीर
दूध संघातून 1800 नव्हे तर 3350 किलो तुपाची विक्री

पुर्वीप्रमाणेच भोंगळ कारभार सुरु आहे.सदर बसेसचा वेळे संबधीत कर्मचारी व अधिकारी यांच्याशी विचारपुस चौकशी केली असता बसस्थानाचा चौकशी वार्ड मधुन आम्हास उडावाउडवीचे उत्तरे देण्यात येतात, तसेच ड्रायव्हर विषयी विचारणा केली असता ड्रायव्हर दारु पिऊन झोपला आहे असे उत्तरे आम्हास मिळत असतात. व असे म्हणतात की तुमच्या कडुन जे काही होईल अशी धमकी देण्यात येते. कोणीही योग्य उत्तर व कार्यवाही करण्यास दुर्लक्ष करीत आहे. तसेच कार्यालयाचा सांगण्यावरुन ड्रायव्हर हा दाऊ पितो तर बस चालवितांनाही

तरी महाराष्ट्र राज्य परिवन मंडळ नवापुर यांनी कुठलीही कारवाई न केल्यास कोळदा गावाच्या वतीने मोर्चा काढुन अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे,पोलिस पाटील अभयसिंग वसावे,अतुल गावीत,मनोहर गावीत,संदिप गावीत अजय वसावे,प्रसेनजीत वसावे,निशांत वसावे,क्षितीज वसावे,आकाश गावित,नरेश वसावे,विपुल; वसावे,सिद्धेश्वर वसावे,उमाजी वासेव,प्रणिता वसावे,रक्षंदा वसावे,निशा वसावे,संजीवनी वसावे,अंजली वसावे,कमला वसावे आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com