मोड शिवारात आढळलेल्या ‘त्या’ बिबटयाचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात

मोड शिवारात आढळलेल्या ‘त्या’ बिबटयाचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात

दत्तात्रय सूर्यवंशी

तळोदा Taloda । -

तालुक्यातील मोड शिवारात (Mod Shivara) चार दिवसांपूर्वी शेतात बिबट्या (leopard) मृतावस्थेत (death) आढळून आला. मात्र, त्याचा प्राण्याच्या झुंजीत मृत्यू झाला की त्याची हत्या करण्यात आली? ही मात्र, बाब संशयाच्या (suspicion) भोवर्‍यात आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे. वन्यजीव शासनाची मालमत्ता असून कोणत्याही प्राण्याला इजा करणे, त्याचा शरीराचा कोणताही भाग काढून घेणे, किंवा, वन्यप्राणी विक्री करणे, कायद्याने गुन्हा ठरतो. मोड ता.तळोदा येथे शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. प्राणी वैद्यकच्या अनुमानानूसार शरीरावर पंजे मारल्याच्या खूणा आहेतॠ झटापटीत मृत्यू झाला असावा. स्वजातीय प्राण्याशी झटपटीत, पंजे मारल्याने मृत्यू होऊ शकतो का? शेतातील रखवालदार सांगतात, बिबट्याच्या भांडणाचे आवाज येत होते. वैद्यकीय सूत्रानुसार बिबट्या मृतावस्थेत आढळून आला, तोपर्यंत त्याचा मृत्यू होऊन चोवीस तास उलटले होते. रखवालदाराने भांडणाचे आवाज ऐकले तर त्याचवेळी वन विभागाला का कळवले नाही? वैद्यक, रखवालदार यांच्या वक्तव्यांव्यतिरिक्त अधिकार्‍यांना खोलात शिरण्याची आवश्यकता का वाटत नाही? वनविभागाला जेव्हा कळले तद्नंतर बिबट्याचा मृत्यू संदर्भात काय कारवाई केली गेली? या घटनेबाबत जनतेच्या मनात साशंकता आहे.

वन्यजीव रक्षणासाठी शासनाचे प्रयत्न, कायदे, योजना असताना एक वन्यजीव अल्पवयीन मृत्यूमुखी पडला या घटनेला जबाबदार कोण? अनेक वर्षे या परिसरात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. शेतकर्‍यांनी याबाबत वनविभागाला कळविले आहे. वनविभागालाही हे प्राणी मानवी वस्त्यालगत राहत असल्याचे माहीत असताना त्यांनी शासनाने अभयारण्य घोषीत केल्या जागांवर स्थलांतरीत करण्यासाठी काय प्रयत्न केले? प्रयत्न केले नाही तर का केले नाही? ही वन विभागाची जबाबदारी नाही का? या विभागाच्या हलगर्जी व वेळकाढू धोरणामुळे आज एका वन्यजीवाची जीवनयात्रा संपुष्टात आली. या घटनेचे शवविच्छेदन अहवाल येतील तेव्हा येतील मात्र, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.

रखवालदार व पशुवैद्यकच्या म्हणण्यानुसार दुसर्‍या बिबट्याने हल्ला केला. त्यात मृत्यू झाला असावा तर हल्ला करणारा बिबट्या कुठे आहे? वन विभाग का माणसांवर हल्ला करण्याची वाट पहात आहे. या प्रकरणी वनविभागाचीच भुमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. वन्यजीव संरक्षण व त्यापासून मानव रक्षण याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहेत. बिबट़याच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. थातूरमातूर कागद रंगवून प्रकरणाकडे डोळेझाक केली आहे. बिबट़याच्या अकाली संशयास्पद मृत्यूमूळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com