शेणांच्या गोवर्‍या, तूपाच्या साहयाने केले जातात अंत्यसंस्कार

अमळनेरच्या जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
शेणांच्या गोवर्‍या, तूपाच्या साहयाने केले जातात अंत्यसंस्कार

बोरद Board । वार्ताहर-

पर्यावरणाचे रक्षण (Protecting the environment) व्हावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखता यावा तसेच वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेत गायीच्या शेणापासून निर्मित गोवरी (Gowri) तसेच गायीचे तूप, निसर्गनिर्मित कापूरच्या (Kapoor) साहाय्याने पर्यावरणाचे रक्षण होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशनच्या गोशाळेच्या (Goshale of Janseva Foundation) वतीने अंत्यसंस्काराचा (funeral) एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या कार्यासाठी फाउंडेशनतर्फे अल्पनिधी घेतला जातो. त्या निधीचा मोबदला म्हणून त्यांच्याकडून मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी शेणापासून निर्मित गोवरीचा पुरवठा केला व जाळण्यासाठी मदत व्हावी म्हणून गायीचे शुद्ध तूप व कपूर ही दिला जातो तसेच वाजंत्री व स्मशानभूमीत अंत्यसंस्कार असलेल्या जागेला रांगोळीच्या माध्यमातून सजविले जाते.

अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते थांबून योग्यरीतीने हा विधी पार पाडतात. लाकडाचा वापर या ठिकाणी टळत असल्याने निसर्गाचा ही समतोल राखला जातो. या मिळालेल्या निधीतून गोमातेच्या रक्षणासाठी सहकार्य मिळते. या उद्देशाने पर्यावरणपूरक अंतिम संस्कार केले जाते.

अमळनेर येथील गोशाळेचे कार्य 30 वर्षापासून सुरू असून गेल्या 5 वर्षापासून पर्यावरणपूरक अंतिम संस्कार या शाळेच्या वतीने सुरू करण्यात आहे. या मिळालेल्या निधीपासून गायीचा चारा उपलब्ध करण्यात येत असतो. जनतेच्या सहकार्याने आम्ही हे पर्यावरणपूरक अंतिम संस्कार करीत आहोत. असे जनसेवा फाउंडेशन चे प्राध्यापक डॉ. अरुण कोचर नानाभाऊ धनगर, सुयोग धनगर यांनी सांगितले.

बोरद येथील माजी सरपंच भीमसिंग राजपूत यांच्या मातोश्री कोंदंबाई राजपूत यांचे निधना समयी बोरद येथे प्रथमच या उपक्रमाला ते आले होते. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही माहिती मिळाली.हा उपक्रम यशस्वी झाल्याने बोरड येथील घनश्याम पाटील यांच्या मातोश्री कलाबाई पाटील व राजू उत्तम राजपूत यांचे निधन प्रसंगी शेणा पासून तयार केलेल्या गोवरीच्या साहाय्याने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे बोरदवासीयांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com