नंदुरबार पालिकेच्या दोनशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेली याचिका न्यायालयाने फेटाळली

नंदुरबार पालिकेच्या दोनशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेली याचिका न्यायालयाने फेटाळली

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार पालिकेवर (Nandurbar Municipality) भाजपाकडून (BJP) होत असलेल्या दोनशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या (corruption) आरोपांबाबत न्यायालयाने (court ) विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर (Leader of Opposition Charudatta Kalvankar) यांची याचिका फेटाळली (rejected) आहे. कुठलेही पुरावे नसतांना बिनबुडाचे आरोप करणार्‍या विरोधाकांनी या सार्‍या प्रकरणात थेट ईडीकडुन चौकशीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयात याबाबत कुठलेही पुरावे सादर करु न शकल्याने ही याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे दुध का दुध, पानी का पानी झाले असल्याची प्रतिक्रीया शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi) यांनी दिली आहे.

नंदुरबार नगरपरिषदेमध्ये विविध विकास कामांमध्ये सन 2005 ते 2020 या कार्यकाळात जवळपास दोनशे कोटींचा भ्रष्टाचार (corruption) झाल्याचा आरोप सातत्याने विरोधी भाजपाकडून (BJP) केला जात होता. यावरुन अनेकवेळा सभा प्रतिसभामधून रणकंदन देखील पहावयास मिळाले होते. याच अनुषंगाने नंदुरबार नगरपरिषदेमधील भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात रिट याचीका दाखल केली होती. या याचिकेमध्ये चारुदत्त कळवणकर (Leader of Opposition Charudatta Kalvankar) यांनी सदर कार्यकाळात नंदुरबार नगरपालिकेत दोनशे कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता.

यातील प्रतिवादी भारत सरकार यांना या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने थेट ईडीमार्फत या सार्‍या प्रकरणाची चौकशी (Inquiry) करण्याची मागणी कळवणकर यांनी केली होती. या याचिकेबाबत न्यायलायाने विचार करत भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांची याचिका फेटाळुन लावली आहे. न्यायालाने याचिकाकर्त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. तसेच याचिका करतांना कलम 156 (3) चा आधार देखील घेतला नसल्याचे नोंदवले आहे.

याचिकाकर्ते कळवणकर यांच्याकडे फक्त लेखापरिक्षण अहवाल असून मुळातच या सार्‍याबाबत यापुर्वीच प्रधानसचिवांनी 10 जुलै 2015 रोजी चौकशी अहवाल सादर केला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या व्यतिरीक्त कुठलेही ठोस असे पुरावे सादर करण्यात भाजपाला अपयश आले असून यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

दूध का दूध : रघुवंशी

या निकालानंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, हा निर्णय म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी सिद्ध झाल्याची प्रतिक्रीया दिली आहे. भ्रष्टाचार झाला नसतांना जनतेची दिशाभूल करण्यासाठी कांगावा करुन दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांकडुन होत असलेल्या आरोपाबाबत कोणतेही पुरावे नसल्याने न्यायालयान त्यांची फेटाळल्याने हे प्रकरणच बरेच काही सांगून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.