नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा खोटा

क्लीन चिट दिल्याचा अहवाल जनतेसमोर सादर करा ः अ‍ॅड. कळवणकर
नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा खोटा
नंदुरबार

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नगरपालिकेत (municipality) कुठलाच गैरव्यवहार व भ्रष्टाचार (corruption) झाला नसल्याचा खोटा दावा माजी आ.चंद्रकांत रघुवंश्ी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी केला आहे. 200 कोटींचा गैरव्यवहार व नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालय, सी.बी गार्डन या वास्तुंच्या गैरव्यवहाराची चौकशी व नंदुरबार नगरपालिकेत मालमत्ता कराबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत दाखल तक्रारीची चौकशी (Inquiry) शासन दरबारी सुरू आहे. या चौकशीत नंदुरबार नगरपालिकेस क्लीन चिट (Clean chit) दिल्याबाबतचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, तेव्हाच दूध का दूध, पानी का पानी होईल असे आव्हान पालिकेचे विरोधी पक्षनेता अ‍ॅड.चारुदत्त कळवणकर (Leader of Opposition Adv. Charudatta Kalvankar) यांनी दिले आहे.

याबाबत पालिकेचे विरोधी पक्षनेता अ‍ॅड.चारुदत्त कळवणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नंदुरबार नगरपालिकेच्या गैरव्यवहारप्रकरणी (Municipal malpractice) महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) दि.23 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकार्‍यांना नगरपालिकेत 200 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चौकशी अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे.

राज्य शासनाच्या (State Government) चौकशीबाबत चाल-ढकल होत असल्याने व नंदुरबार शहरातील विविध प्रकल्पांना 120 कोटींची रस्ते योजना, 55 कोटींचा भुमीगत गटारीचा प्रकल्प, पाणी पुरवठा योजना तसेच जमीनींचे आरक्षण टाकणे, बदलवणे, नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालय, सी.बी गार्डन या वास्तुंमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत केंद्र शासनाच्या सक्त वसुली संचालनालया (ईडी) (Directorate of Strict Recovery) मार्फत गैरव्यवहाराची (malpractice) चौकशीसाठी याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने याबाबत पोलीस (police) तक्रार दाखल करण्यात आली का? पोलीसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यास भारतीय दंड विधान कलम 156(3) नुसार न्यायालयात दाद मागता येते अशाप्रकारे आपल्या आदेशात उल्लेखीत केले. दाखल कागदपत्रात अजून कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीसात तक्रार दाखल करणार आहोत.

शासनाची चौकशी अद्यापही प्रलंबित आहे. नुकतीच नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालयात, सी.बी गार्डनबाबत ही तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे (Collector) प्रलंबित आहे. त्यामुळे कुठेही दुध का दुध व पानी का पानी झाले नसून उच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून जनतेची दिशाभुल माजी आ.रघुवंशी करत असल्याचा आरोप कळवणकर (Leader of Opposition Adv. Charudatta Kalvankar) यांनी केला आहे. नगरपालिकेत कुठलाच गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला नसल्याचा खोटा दावा (False claim) त्यांनी केला आहे. मुळातच खरच दुध का दुध पानी का पानी करायच आहे तर 200 कोटींचा गैरव्यवहार व नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालय, सी.बी गार्डन या वास्तुंच्या गैरव्यवहाराची चौकशी व नंदुरबार नगरपालिकेत मालमत्ता कराबाबत झालेला गैरव्यवहाराबाबत दाखल तक्रारीची चौकशी शासन दरबारी सुरू आहे. या चौकशीत नंदुरबार नगरपालिकेस क्लीन चिट दिल्याबाबतचा अहवाल जनते समोर जाहीर करावा, असे आव्हान देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.