अमृत आहारसाठी खात्यात पडणारी पूर्ण रक्कम देण्यास सेंट्रल बँकेचा नकार

धडगांव येथील प्रकार, गटविकास अधिकार्‍यांना दिले निवेदन
अमृत आहारसाठी खात्यात पडणारी पूर्ण रक्कम देण्यास सेंट्रल बँकेचा नकार

मोलगी Molgi। । वार्ताहर

बालमृत्यू, मातामृत्यू व कुपोषण टाळण्यासाठी सेवा बजावताना अंगणवाडी कर्मचार्‍यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. असे असतानाच पुन्हा धडगावात (Dhadgaon) तालुक्यातील कर्मचार्‍यांना अमृत आहारसाठी (nectar diet) खात्यात पडणारी पूर्ण रक्कम )(full amount)देण्यास सेंट्रल बँकेने (central bank) नकार (refuses) दिला. त्यामुळे तालुक्यातील तिन्ही प्रकल्पातील सर्व कर्मचारी दुहेरी संकटात सापडले आहे. बँकेच्या या भूमिकेविरुद्ध गट विकास अधिकार्‍यांना (Group Development Officer) निवेदन (Statement) देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्र उभारणीतील प्राथमिक सेवा बजावणार्‍या अंगणवाडी कर्मचारी नेहमीच या ना त्या संकटाचा सामना करीत आल्या आहेत. खरं तर सेवेत कुठलीही उणीव भासू दिली नाही, असे असतानाही धडगावात तालुक्यातील धडगावसह खुंटामोडी व तोरणमाळ या तिन्ही प्रकल्पातील कर्मचार्‍यांना पुन्हा एका नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

या कर्मचार्‍यांना अमृत आहार खरेदीसाठी शासनाकडून मिळणारा निधी थेट बँक खात्यात जमा होतो. ही सर्व खाती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या धडगाव येथील शाखेत आहे.

या शाखेतील खात्यात जमा होणार्‍या निधीपैकी प्रत्येकवेळेस केवळ पाच-पाच हजाराचीच रक्कम दिली जाते, उर्वरित रक्कम देण्यास सपशेल नकार दिला जातो. दुसर्‍या बाजूने आहार उपलब्ध करुन देणारी यंत्रणा आहाराची पूर्ण रक्कम देणे बंधनकारक करतात, त्यामुळे वरील तिन्ही प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी पुन्हा दुहेरी संकटात सापडल्या आहे.

बँकेच्या या भूमिकेवर नियंत्रण आणत पूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व बँकेच्या शाखाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात आठ दिवसात बँकेच्या या व्यवहारात बदल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्याच आहार वाटपाचे काम थांबविण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, अमोल बैसाणे, भिलीस्थान आदिवासी टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष जोगिंदसिंह वळवी, फुलवंती पाडवी, राखी पाडवी, वैशाली वसावे, मालती वळवी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com