मोठ्ठी बातमी : राष्ट्रीय महामार्ग विसरवाडी जवळील पूल पुन्हा गेला वाहून

मोठ्ठी बातमी : राष्ट्रीय महामार्ग विसरवाडी जवळील पूल पुन्हा गेला वाहून

नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नंदुरबार जिल्ह्यात पुढील तीन दिवसात (three days) मुसळधार पावसाचा (torrential rain) इशारा (Warning) दिला असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसात सातपुडा पर्वत रांगेतील (Satpuda mountain ranges) अक्कलकुवा, धडगाव आणि सपाटी भागातील नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. आज पुन्हा या परिसरात पावसाने जोर धरला आहे.

नवापूर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा (National Highway No. Six) वरील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील (Sarpani River) पूल पुन्हा वाहून (Carrying the bridge over) गेल्याने महामार्ग बंद (Highway closed) झाला आहे.

गेल्या 24 तासात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर काल रात्रभर व आज दुपारपर्यंत नदीमध्ये तात्पुरत्या कच्च्या पुलाचे काम केले होते, मात्र आज संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेल्याने दुरुस्ती केलेल्या कामावर पाणी फिरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास माती टाकून तयार केलेला पूल वाहून जाण्याचे दाट शक्यता असून पुन्हा गैरसोय होणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com