
मोलगी molgi । वार्ताहर
दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या धडगाव व अक्कलकुवा (Dhadgaon and Akkalkuwa) या दोन तालुक्यांना जोडणार्या पुलाची (bridge) उदय नदीच्या पुरात नेहमीच नासधूस होते. मागील अतिवृष्टीत मात्र हा पूल पूर्णत: पोखरला गेला आहे. शिवाय कठडे तुटल्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकेदायक (Hazardous to traffic) ठरत आहे. हा धोका टाळण्यासाठी तेथे नवीन पुलाची आवश्यकता आहे.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात झालेल्या मुख्य रस्त्यांमध्ये असली ते धडगाव व डाबमार्ग असली ते अक्कलकुवा या रस्त्याचाही समावेश आहे. या मार्गावर 1990 च्या कालावधीत असली गावाजवळ उदय नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके जोडले गेले. या पुलाच्या माध्यमातूनच या दोन्ही तालुक्यांमधील नागारिकांना वाहतुकीची सुविधा निर्माण झाली आहे. परंतु नदीला येणार्या रचनाच काहीअंशी चूकीची ठरते. त्यामुळे वाहतूक सुविधेला धोका निर्माण झाला आहे. अनेक नदी-नाल्यांमधून तयार झालेली उदय नदी ही या दोन्ही तालुक्यांमधून वाहणारी व नर्मदा नदीची सर्वात मोठा नदी आहे. या नदीला दर पावसाळ्यात मोठा पूर येत असतो.
त्या पूरपातळीच्या तुलनेत या पुलाची उंंची अत्यंत कमी ठेवण्यात आली. त्यामुळे उदय नदीला आलेला प्रत्येक पूराचे पाणी या पुलावरूनच जाते. त्यात पुलाच्या कठड्याची पूर्णत: दुरवस्था झाली. त्यामुळे हा पूल काही वर्षांपासून वाहतूकसेवेला धोक्याचा ठरतो. हा धोका कायम असतानाच मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे या पुलाच्या ओघवता भाग पूर्णपणे पोखरला गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूकीला दुहेरी धोका निर्माण झाला आहे. हा धोका तथा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी पुराच्या तुलनेत नवीन उंच पूल बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. हा मार्ग त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत या दोन तालुक्यातील नागारिकांच्या सुविधेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्याची अपेक्षा
पूल पूर्णपणे पोखरला गेल्यामुळे पुढील पावसाळ्यात हा पूल तुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य व वाहतुकीची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी नवीन पूल निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
या ठिकाणी नवीन पूव तयार करण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला उंच भाग असल्यामुळे पूल निर्मितीसाठी अतिरिक्त भरावाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हे ठिकाण नवीन पुलासाठी अनुकूल आहे. नवीन पुलाची मागणी करताना दोन्ही तालुक्यांमधील नागारिकांमार्फत पुराच्या तुलनेत व सुरक्षेसाठी समाधानकारक उंचीचा पूल असावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या कालावधीत मोठी यात्रा भरणार्या अस्तंबा या गावाकडे जाण्यासाठी देखील हाच पूल सोयीस्कर ठरतो. तेथे जाणार्या भाविकांची संख्या अधिक राहत असून त्यांची सुरक्षा व सोयीसाठी येथे नवीन पुलाची आवश्यकता आहे.
दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व धडगाव व अक्कलकुवा या दोन तालुक्यांना जोडणार्या पुलाची उदय नदीवरील हा पूल प्रवाशांना देखील महत्वाचा आहे.याच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेकडुन कदापी महत्त्व दिले गेले नसावे, म्हणून या पुलावर कठडेच बनले नाही.
- प्रकाश दमण्या वळवी, नागरिक, असली
उदय नदीवरील पूलच नव्हे तर असली -धडगाव, मोलगी, अक्कलकुवापर्यतच्या रस्त्यावर सुरशित वाहतुकीसाठी संपूर्ण उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे.
- शिशिर कमलेश वळवी, नागरिक, असली