दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केला बापाचा खून

नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील रांझणी दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून बापाचा मुलाने खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अक्कलकुवा (police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथे राहणाऱ्या यशवंत दसऱ्या पाडवी यांचा मुलगा राकेश यशवंत पाडवी याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र यशवंत दसऱ्या पाडवी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन राकेश पाडवी याने यशवंत दसऱ्या पाडवी (वय २५) यांना काठीने मारहाण करून मुक्कामार देवून जिवे ठार मारले

याप्रकरणी आकाश यशवंत पाडवी रा.रांझणी पो . रायसिंगपूर ता.अ.कुवा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात राकेश यशवंत पाडवी रा.रांझणी ता.अ.कुवा यांच्या विरुद्ध भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास राजेश गावीत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com