47 व्या दिवशी मृतदेहावर करण्यात आले अंत्यसंस्कार

47 व्या दिवशी मृतदेहावर करण्यात आले अंत्यसंस्कार

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

धडगांव (Dhadgaon ) तालुक्यातील खडक्या येथील माहेर असलेल्या विवाहित महिलेवर (married woman) अत्याचार (torture) करून तिची हत्या (murder) करण्यात आल्याचा आरोप करीत कुटूंबियांनी तिचा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह मिठाच्या खड्डयात (Dead body in salt pit) पुरला होता. पुर्न शवविच्छेदनाची मागणीनुसार काल दि.15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे दुसर्‍यांदा शवविच्छेदन (Autopsy) झाल्यानंतर धडगांव तालुक्यातील खडक्या येथे नातेवाईकांसह (relatives) पोलीस बंदोबस्त (Police arrangements) पिडीत विवाहितेचा मृतदेहावर (Victim's spouse) 47 व्या दिवशी अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

अक्राणी तालुक्यातील खडक्या येथील माहेर असलेली विवाहितेला तालुक्यातील वावी येथील रंजीत ठाकरे याने त्याचा साथीदारांसह दुचाकीवर बसून नेत अत्याचार करून खून केल्याचा आरोप पिडीत विवाहितेचा कुटूंबियांनी केला आहे. मात्र याबाबत पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नोंद केली होती. त्यामुळे पिडीतेच्या न्यायासाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता सुमारे 45 दिवसांपर्यंत मिठाने आच्छादन केलेल्या खड्डयात केलेल्या खड्यात मृतदेह पुरून ठेवला होता.

मुंबई येथे शवविच्छेदन करून संशयीतांवर कठोर कारवर्इा होइपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटूंबियांनी घेतला होता. मयत पिडीतेच्या कुटूंबियांच्या मागणीची दखल घेत मुंबई येथे दुसर्‍यांदा शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली होती.

त्यानुसार दि.15 सप्टेंबर रोजी मुंबई येथील जे.जे.रूग्णालयात दुसर्‍यांदा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर काल दि.16 सप्टेंबर रोजी 4.30 वाजेच्या सुमारास धडगांव तालुक्यातील खडक्या येथे पिडीत विवाहितेचा मृतदेह आणण्यात आला. 47 व्या दिवशी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, म्हसावद पोलीस निरीक्षक निवृत्त पवार, धडगांव उपनिरीक्षक राहुल पाटील आणि पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान आता शवविच्छेदन अहवाल कधी प्राप्त होतो.त्यात काय नमुद करण्यात आले आहे. यांनतरच घटनेची उकल होणार असल्याने जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com