२४ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

२४ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

म्हसावद । Mhsavad

म्हसावद ता.शहादा येथे तोरणमाळ रस्त्यावर रिद्धी सिद्धी गणपतीच्या उत्तरेला वळणावर रस्त्याच्या बाजूला एका खोलचारीत मोटरसायकलसह कुजलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात सदर कुजलेला मृतदेह इस्लामपूर ता.शहादा येथील युवकाचे असल्याची माहिती म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली.

म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या काही अंतरावर रस्त्याला लागून एक मोठी कवटी रस्त्यावर होती.त्या कवटीची दुर्गंधी पसरत होती. याबाबत म्हसावद महिला दक्षता समिती अध्यक्षा यांनी पत्रकारास माहिती दिली. पत्रकाराने पोलिसांची संपर्क साधून त्या संदर्भात माहिती दिली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आपल्या सहकारी पोलीस कर्मचार्‍यांचा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रस्त्याच्या आजूबाजूला शोधाशोध केली. नेमकी माणूस जातीची कवटी आली कुठून हा प्रश्न भेडसावत होता.

रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर खोलचारीत मोटरसायकल (क्रमांक एम.एच.39एल.2481) सह एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याचीच कुजलेल्या स्थितीत असलेली कवटी एखाद्या प्राण्याने ओढून नेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेहाच्या खिशात मोबाईलदेखील आढळून आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ए.आर. शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात नेला.

दरम्यान, दि.24 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथील कोतवाल युवक विनोद जेठ्या पावरा हा हरवल्याची तक्रार म्हसावद पोलिसात दाखल होती. हा त्याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलीस स्टेशनला बोलवले जाणार आहे. 24 दिवस झाल्याने मृतदेह पूर्णतः कुजले आहे.रस्त्याच्या बाजूला खोलचारी व काटेरी झुडपे असल्याने दिसून आला नाही. म्हसावद पोलिसात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.एकंदरीत कवटी रस्त्यावर बाजूला पडलेली दिसून आल्याने प्रकरणाच्या उलगडा झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com