
नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar
धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील कुंडल येथे 25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी (police) पोलीस अधिक तपास करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागात अज्ञातस्थळी सदर युवतीचा मृतदेह आढळला आहे.
दोन दिवसापूर्वीच हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा दिसून येत आल्या, उन्हामुळे शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ललिता मोतीराम पाडवी सदर युवतीचे नाव असून (shirpur) शिरपूर येथे कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.
शिरपुर हुन शहादा मार्गे धडगाव येत असल्याचा आई वडिलांना फोन आला होता. त्यानंतर सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता दोन दिवसांपासून बेपत्ता होती त्यामुळे आई-वडील शोध घेत होते.मृतदेह घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर बॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला.
मृतदेहापासून पाचशे मीटर अंतरावर बॅग, कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला. धडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत. धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.