
नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या कार्याला तोड नसल्यामुळे कोणीही उठसूट कितीही काहीही टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप केले तरी त्याच्या काही परिणाम होणार नाही अशी स्पष्टोक्ती बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पर्णिता पोंक्षे यांनी केली.
नगरपरिषदेच्या सभागृहात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या श्रीमती पोंक्षे बोलत होत्या. मंगळवारपासून ६ दिवस पर्णिता पोंक्षे नंदुरबार जिल्ह्याच्या दौरावर आहेत.
नवापूर, तळोदा, धडगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. यावेळी पर्णिता पोंक्षे म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत राहणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने शक्ती कायदा पारित केला आहे.
या कायद्याच्या वापर महिलांना करता आला पाहिजे. जोपर्यंत पीडित समस्याग्रस्त महिला तक्रार करत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
बैठकीच्या सुरुवातीला नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी पर्णिता पोंक्षे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बैठकीत जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी पंचायत समिती सभापती माया माळसे, उपसभापती शितल परदेशी, जि.प.सदस्य शकुंतला शिंत्रे, जागृती मोरे, नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत, मनीषा वळवी, ज्योती योगेश राजपूत, ज्योती पाटील, कुरेशी फहमिदाबानो रियाज, श्रीमती मेमन मेहरुंनिसा अ.गनी, पं.स सदस्या बायजाबाई भील, बेगाबाई भील, दीपमाला पाडवी आदी उपस्थित होते.