प्रकाशा परिसरात डेंग्यूचे थैमान

प्रकाशा परिसरात डेंग्यूचे थैमान

प्रकाशा Prakasa ता. शहादा । वार्ताहर-

प्रकाशा गावांत डेंग्यूसह ( dengue) मलेरियाने (Malaria) थैमान घातले आहे. डेंग्यूचे गावात सुमारे 20 रुग्ण असून त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना (Measures) करण्याची गरज आहे. परंतू ग्रामपंचायत प्रशासनाने (Gram Panchayat Administration) त्याकडे दुर्लक्ष (Ignore) केले आहे.

गेल्या महिन्याभरात प्रकाशा गावात वेगवेगळ्या भागात थंडी, ताप, सह हातपाय दुखणे या रुग्णाची संख्या वाढली आहे. बालकांना सर्दी खोकला तापचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक डॉक्टरांकडून हे रुग्ण दोन ते तीन दिवसांचे औषधोपचार घेत आहेत. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास हे रुग्ण याज खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे आपली रक्ताची तपासणी करून घेत आहेत.

त्यातील काहींचा अहवाल डेंग्यू तर काहींचा मलेरिया पॉझिटीव्ह आढळून येत आहे. अनेक जण आपल्या पद्धतीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. गेल्या आठवड्यात बुधवार बाजारपरिसरातील दहा वर्षीय मुलीला डेग्युची लागण झाली होती. तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतू पूर्ण सुविधांअभावी तिच्या कुटुंबानी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावेळी या रुग्णाची तपासणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने. तात्काळ या परिसरात प्रा.आ.केंद्राचे डॉ.विवेक बावस्कर यांनी पाहणी केली असता त्या भागात डेंग्यूंच्यां अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या भागात 10 रुग्ण निघाले आहेत. त्या भागातील सर्व रहिवाश्यांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन या आरोग्य अधिकारी डॉक्टरांनी केले.

त्या परिसरातील पडलेल्या टायर, पाण्याचे टँकर आदी ठिकाणी साफ सफाई करण्याचा सल्ला दिला. यावेळी आंबालाल कोळी यांनी ग्रामसेवकांना भ्रमणध्वनी द्वारे या परिसराची माहिती दिली व या भागात धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली. परंतु आठवडा झाला तरीही या भागात आजपर्यंत कोणीच आले नाही.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बावस्कर यांनी सांगितले, डेंगूचे रुग्ण या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. लोकांनी कोरडा दिवस पाळावा जेणेकरून या डेंगूचे प्रमाण कमी होईल. कारण शुद्ध पाण्यात याच्या आळया तयार होतात.

आठवडे बाजार भागात, कोळीवाडा भागात, सिदार्थनगर भागात, इतर भागात असे एकुण20 रुग्ण बाहेर गावी उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com