खुंटामोडी येथे डेंग्यूचे थैमान

खुंटामोडी येथे डेंग्यूचे थैमान

मोलगी Molgi । वार्ताहर-

खुंटामोडी (Khuntamodi) ता.धडगाव येथे डेंग्यू (Dengue)आजाराने आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला आहे. शहरासह तालुक्यात अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी(treatment) रुग्णालयात (hospital)गर्दी(Crowd) पहायला मिळत आहे. यात संशयित रुग्णांची संख्या लक्षणीय असून अनेकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे शहरातील नगरपंचायत (Nagar Panchayat) व तालुक्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) प्रशासनाने उपाययोजना (Measures)करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. शहरात सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे. या सोबतच डायरिया आजाराने देखील थैमान घातले असून या आजाराची रुग्णसंख्याही चिंताजनक आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहे तर नगरपंचायत प्रशासन सुस्त आहे. शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग वाढले आहेत.गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात कचरा पडून आहे. कचरा संकलन केला जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवासंपासून संततधार पाऊस सुरु आहे. परिणामी डेंग्यू, डायरिया व साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यात सर्वाधिक धोका बालकांना आहे. मात्र, नगरपंचायतीचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. येथील नगरपंचायतीचा एप्रिल महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त झाली आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या प्रशासक पदाचा कार्यभार शहादा प्रांताधिकार्‍यांकडे आहे.

दरम्यान, येथील मुख्याधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरी समस्यांमध्ये वाढ झाली आहे. नगरपंचायत प्रशासकदेखील नगरपंचायतीत हजेरी लावत नसल्याने प्रशासनाचा कारभार डळमळीत झाला आहे. मुख्याधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत स्थानिक कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत आहे. नगरपंचायत मुख्याधिकारी उपलब्ध होत नसल्याने शहरातील समस्या मांडाव्या कुणाकडे असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या तीन महिन्यात नगरपंचायत प्रशासनावर प्रशासकाचा अंकुश नसल्याने प्रशासन ढिम्म होवून शहरात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. आता डेंग्यूने डोके वर काढले असतांना शहरात अद्यापही फवारणीला सुरुवात करण्यात आलेली नाही. डेंग्यूचे आक्रमण रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसून ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यातच तालुक्यातील खुंटामोडी येथे डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या दोन आठवड्यात दोन जणांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. यात एका तीस वर्षीय तरुण व एका बावीस वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. यामुळे खुंटामोडी गावासह तालुक्यातील इतर गावात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना राबवून डेंग्यूचे उच्चाटन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com