टीईटी घोटाळा : तपासासाठी पुण्याचे पथक आल्याची चर्चा

सुकदेव डेरे यांच्या काळातही एजंट कार्यरत
टीईटी घोटाळा : तपासासाठी पुण्याचे पथक आल्याची चर्चा

नंदुरबार । दि.Nandurbar। प्रतिनिधी

टीईटी घोटाळयाप्रकरणी (TET scam) अटकसत्र सुरु झाले आहे. या घोटाळयाचे धागेदोरे नंदुरबार जिल्हयापर्यंत असल्यामुळे एजंटांच्या तपासासाठी (investigation of agents) पुणे येथील पथक (team from Pune) नंदुरबारात आल्याची आज दिवसभर चर्चा सुरु होती. मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होवू शकली नाही. दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुकदेव डेरे (Education Officer Sukdev Dere) यांना देखील याप्रकरणी अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांच्या काळातदेखील काही हस्तक कार्यरत होते.

टीईटी घोटाळा : तपासासाठी पुण्याचे पथक आल्याची चर्चा
S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

टीईटी घोटाळयाप्रकरणी मुख्य सुत्रधार तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या झडतीत कोटयावधींची मालमत्ता तसेच परिक्षेसंबंधी काही साहित्य सापडले आहे. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्याकडे त्यांच्या एजंटांची माहिती असलेली डायरीदेखील सापडली असल्याचे समजते. त्यामुळे सुपे यांच्या अटकेनंतर आता एजंटांचे अटकसत्र सुरु झाले आहे. पुण्यात काही एजंटांना अटकही करण्यात आल्याचे समजते. टीईटी घोटाळयाचे धागेदोरे नंदुरबार जिल्हयापयर्ंंत असल्याने पुणे येथील पथक आज नंदुरबार जिल्हयात चौकशीसाठी आल्याची दिवसभर चर्चा होती. परंतू हे पथक आले किंवा नाही, आले असेल तर त्यांनी कुठे भेट दिली याचीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, आज महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुकदेव डेरे यांना अटक केली आहे. श्री.डेरे हे सन 2005 ते 2007 च्या सुमारास नंदुरबार येथे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातदेखील जिल्हयात त्यांचे काही एजंट कार्यरत होते. त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com