टीईटी घोटाळा : दलालांचे सातत्याने होतात नाशिक, पुणे दौरे

टीईटी घोटाळा : दलालांचे सातत्याने होतात नाशिक, पुणे दौरे
USER

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

शिक्षण विभागातील (Department of Education) सर्व प्रकारची कामे (Works) जिल्हयात कार्यरत असलेले दलाल (Broker) करतांना दिसतात. यासाठी त्यांचे सातत्याने नाशिक, पुणे येथे दौरे असतात. जिल्हयात किंवा इतर ठिकाणी कोणताही नवीन अधिकारी (New officer) नियुक्त झाला तर तो ‘आपलाच’ आहे, अशा पद्धतीने या दलालांचा वावर असतो.

टीईटी घोटाळा : दलालांचे सातत्याने होतात नाशिक, पुणे दौरे
रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

टीईटी परीक्षेतील घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना लाखो रुपयांच्या रोकडसह पुणे पोलीसांनी अटक केली आहे. त्यांचे हस्तक राज्यभर कार्यरत असून त्यांचीही चौकशी सुरु झाली आहे. श्री.सुपे हे नाशिक येथे उपसंचालक असतांना त्यांचे नाशिक विभागातही मोठया प्रमाणावर लागेबांधे आहेत. ते उपसंचालक असतांना त्यांचे हस्तक (दलाल) शिक्षण विभागातील सर्व प्रकारचे काम ‘टक्केवारी’वर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मग ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अ‍ॅप्रोव्हल असो, तुकडयांची मान्यता असो, नवीन शाळांचा प्रस्ताव असो, वाढीव पदांची मंजूरी असो, शाळांची तपासणी आदी प्रकारची कामे याच दलालांमार्फत केली जात होती.

आजही त्यांच्यामार्फतच ही कामे होत आहेत. त्यामुळे या दलालांचे नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथील शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद या कार्यालयांमध्ये सातत्याने दौरे सुरु असतात. यातील काही जण तर अधिकार्‍यांच्या घरातील खाजगी कामेदेखील करुन देतात. अधिकार्‍यांना पाटर्या देणे, वेगवेगळया भेटवस्तू देणे हे त्यांचे नित्याचेच काम आहे.

टीईटी घोटाळा : दलालांचे सातत्याने होतात नाशिक, पुणे दौरे
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

त्यामुळे अधिकारीदेखील खुष होतात. मात्र, हे दलाल त्याचा फायदा घेत कोणताही नवीन अधिकारी नंदुरबारला आला किंवा नाशिक येथे वरिष्ठ जागेवर बसला तर तो ‘आपलाच’ आहे, अशा अविर्भावात वावरत असतात. त्यामुळे हे दलाल ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तेथे संस्थाचालकांच्याही ते मर्जीतील बनले आहेत. संस्थाचालकदेखील त्यांनाच संस्थेशी संबंधीत कामे सांगून ते करवून घेत असल्याचे समजते. या दलालांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांची चौकशी होवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, आज दि. 18 डिसेंबर रोजी देशदूतमध्ये ‘महाघोटाळयाचे धागेदोरे पोहचले नंदुरबारपर्यंत-300 उमेदवारांकडून एजंटांनी कोटयावधी रुपये गोळा केल्याची चर्चा’ या मथळयाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्ताची दिवसभर जिल्हाभरातील चर्चा होती. शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातील लोकांनी दूरध्वनीवरुन तसेच सोशल मीडियावरुन वृत्ताचे स्वागत केले. शिक्षण क्षेत्राला बदनाम करणार्‍यांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.