Video तहसिलचा वीज पुरवठा खंडीत केल्याने तहसिलदारांनी महावितरणचे कार्यालय केले सील

थकबाकीवरुन महावितरण-तहसिलचा एकमेंकांना शॉक
Video तहसिलचा वीज पुरवठा खंडीत केल्याने तहसिलदारांनी महावितरणचे कार्यालय केले सील

नंदुरबार : प्रतिनिधी nandurbar

थकबाकीवरुन काल महावितरण आणि (Tehsil Office) तहसिल कार्यालयात चांगलीच जुंपली होती.वीज बिल थकीत असल्याने (MSEDCL) महावितरणने तहसिल कार्यालयाचा (Power) वीज पुरवठा खंडीत केला तर तहसिलचे कामकाज ठप्प असल्याने महावितरणकडे महसूलची अकृषक थकबाकी असल्याने तहसिलदारांनी तात्काळ कारवाई करत चक्क महावितरणचे कार्यालयच सील करत प्रतिशॉक दिला.

एकमेंकाना शॉक देत केलेल्या कारवाईची चर्चा :- दोघा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांत गेल्यावर तेथे वरिष्ठांच्या मध्यस्थीने समझोता घडविला जात होता. अभियंता मनीषा कोठारी यांनी प्रोसिजर चालू असल्याचे सांगत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कोषागारतून वीजबिल भरण्याची रक्कम अदा करण्याची तजवीज करण्यात आली आहे. ५० हजार रुपये प्राप्त झाले असून उर्वरित रक्कम दोन दिवसात प्राप्त झाल्यावर भरणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान काल सायंकाळपर्यंत दोघांमध्ये समझोता घडविण्याचे सुरू होते. दरम्यान दोघा विभागांनी एकमेंकाना शॉक देत केलेल्या कारवाईची चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान, दोघा विभागांनी पोलीसांत धाव घेतल्यावर काल सायंकाळ उशिरापर्यंत मध्यस्थी करण्याचे काम सुरू होते.

महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदार व वीज चोरांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.

महावितरणकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी असल्याचे सर्वसामान्यांचे थेट वीज पुरवठा खंडीत करत शॉक दिला जात आहे.दरम्यान नंदुरबार तहसिल कार्यालयाकडे महावितरणचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिल थकले होते. यामुळे महावितरणच्या कार्यकारी उपअभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयालावीज बिलाची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे सांगितले होते. परंतु ट्रेझरीमधून बिलाची रक्कम हस्तांतरित होण्याला दोन दिवसाचा अवकाश असल्यामुळे वीज बिल भरले गेले नाही. त्यातच सध्या तहसिल कार्यालयात विविध महत्वाची कामे सुरू असल्याने दोन दिवसांनी भरणा करणार असल्याचे तहसिलदारांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

मात्र महावितरणने तहसिल कार्यालयाला शॉक देत चक्क वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले.यामुळे तहसिलदारांनी प्रतिशॉक देत महावितरण कंपनीच्या सबस्टेशन आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा अकृषक भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले. या कारवाईमुळे वीज वितरणच्या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. संतप्त कार्यकारी अभियंता पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वीज वितरणचे काम बंद करत पोलिस ठाणे गाठले.दुसऱ्या बाजूला तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी वीज कंपनीच्या सर्व कार्यालयाची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचा इशारा दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com