तहसीलदार संघटनेचे काळ्या फीती लावून धरणे आंदोलन

तहसीलदार संघटनेचे काळ्या फीती लावून धरणे आंदोलन

नंदुरबार - nandurbar

महाराष्ट्र (maharastra) राज्य तहसिलदार (Tehsildar) व नायब तहसिलदार संघटनेच्या प्रलंबीत सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्याने तहसिलदार व नायब तहसिलदार (Deputy Tehsildar) यांनी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले.

या आंदोलन प्रसंगी महेश शेलार उपजिल्हाधिकारी, भाऊसाहेब थोरात तहसीलदार नंदुरबार, मंदार कुलकर्णी तहसीलदार नवापूर, गिरीश वखारे तहसीलदार तळोदा, सचिन मस्के तहसीलदार अक्कलकुवा, ज्ञानेश्वर सपकाळे तहसीलदार अक्राणी, भीमराव बोरसे नायब तहसीलदार नंदुरबार, राजेश अमृतकर नायब तहसीलदार नंदुरबार, रमेश वळवी नायब तहसीलदार नंदुरबार, रिनेश गावित नायब तहसीलदार नंदुरबार, रामजी राठोड नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय, चौधरी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय, शैलेश गवते नायब तहसीलदार तळोदा, शेखर मोरे नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय, श्रीमती सोनवणे नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय यांची उपस्थिती होती.

या मागण्या आहेत शासनस्तरावर प्रलंबीत

१) नायब तहसिलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे

२) तहसिलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे

३) नायब तहसिलदार संवर्गातून तहसिलदार संवर्गात पदोन्नती करणे

४) तहसिलदार संवर्गातून पजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे

५) नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे.

६) परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधिन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव निकाली काढणे

७) नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे

८) नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव निकाली काढणे

९) सेवानिवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तत्काळ निकाली काढणे

१० महिला अधिकाऱ्यांबाबतीत महसूल विभाग वाटप करताना प्राधान्याने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे.

या मागण्या प्रलंबीत असून त्या तत्काळ निकाली काढण्यात याव्यात या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आले.

Related Stories

No stories found.