सोनखांबजवळ टँकर-ट्रकची समोरासमोर धडक

चालक गंभीर जखमी
सोनखांबजवळ टँकर-ट्रकची समोरासमोर धडक

नवापूर Navapur। श.प्र.-

टँन्कर-ट्रकची (Tanker-truck) समोरासमोर धडक (Beat) होवून चालक गंभीर जखमी (driver was seriously injured) झाल्याची घटना घडली.

गेल्या काही दिवसापासून धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी जोरदार पाऊस सुरु असताना धुळे सुरत महामार्गावरील सोनखांब गावाच्या पुढे वळणावर भरघाव वेगात येणार्‍या ट्रक आणि टँन्करची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामुळे टंँन्कर चालक कॅबीनमध्ये अडकून पडला होता. त्याचा पाय तुटल्याने तो जबर जखमी झाला आहे.

या अवस्थेत 108 चालक मानसिंग गावीत यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने जखमी चालकाला बाहेर काढून तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात पाऊस सुरू झाला असून महामार्गावर खडी, रेती,चिखल पसरला आहे. त्यामुळे भरधाव येणारे वाहन स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. वाहन चालकांनी पावसाळ्यात आपले वाहन हळुवार चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com