टँकर चोरी करणार्‍याला पंजाबमधून अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
टँकर चोरी करणार्‍याला पंजाबमधून अटक

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

शहादा येथील टँकर चोरीतील (Tankers stolen) आरोपीस (Accused) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) पंजाबमध्ये अटक (Arrested) केली. तर एक जण फरार झाला आहे. याप्रकरणी 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर पोलिसांनी (police) हस्तगत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार सुनिलसिंग रघुविरसिंग काला (Sunil Singh Raghuvir Singh Kala) (रा.हाऊस नंबर 44, धानेगांव ता.जि. नांदेड) यांचा ट्रान्सपोर्टचा (transport) व्यवसाय आहे. सुनिलसिंग यांनी त्यांचे मालकीचे 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर (Tanker) हे नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यावर लावले होते. ते विविध खांडसरीमधून मळी (मोलेसीस) भरुन लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यामध्ये वाहतुक करण्यासाठी त्यांनी टँकर भाडेतत्वावर (rental basis) लावलेले होते व त्या टँकरवर जोबनप्रितसिंग तरलोकसिंग, बलविंदरसिंग बलदेवसिंग (दोन्ही रा.अमृतसर पंजाब) यांना चालक म्हणून ठेवलेले होते.

परंतु दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी वरील दोन्ही इसमांनी सुनिलसिंग यांच्या मालकीचे दोन्ही टँकर चोरुन (Stealing) नेले. दोन्ही आरोपीतांविरुध्द् शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे (local crime branch) सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करुन तात्काळ पंजाब राज्यात रवाना केले. पथकाने पंजाबमधील (Punjab) अमृतसर, तरण तारण, जिल्ह्यातील मेहता, बटाला, नांगली, पिखीपिंड, काले, बियास आदी गावांमध्ये जावून संशयीत दोन्ही आरोपीतांचा ठावठिकाणा शोधला.

पथकने आरोपीताच्या (accused) पत्नीची माहिती काढून तिच्या घराच्या आजू-बाजुस वेषांतर करुन बातमीदारांचे जाळे निर्माण केले. संदिप पाटील यांनी वेषांतर करून पाळत ठेवून संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेतली.

दि. 03 मार्च 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी (meet the wife) सायंकाळी त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचला. पोलीसांनापाहताच त्याने पळ काढला. पथकाने 1 किमी पाठलाग करून बलविंदरसिंग बलदेवसिंग रा.काले ता पिथीपिंड जि. तरण तारण पंजाब यास ताब्यात घेतले. त्याला शहादा येथील टँकर चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा दुसर्‍या साथीदाराबाबत केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहता येथे तो जाऊन जोबनप्रितसिंग याचा शोध घेत असताना त्याला पोलीस पाठलाग करीत असल्याचा संशय येताच पळून गेला. बलविंदरसिंग बलदेवसिंग यास शहादा येथे न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने त्यास दि.9 मार्च 2022 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयीत आरोपी बलविंदरसिंग बलदेवसिंग याच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेले 45 लाख रुपये किमंतीचे दोन्ही टँकरबाबत विचारपुस केली असता बलविंदरसिंग याने ते टँकर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे लपवून ठेवले असल्याबाबत सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे (local crime branch) पथक धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर - ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथे गेले असता पथकाला ढाब्याच्या पाठीमागे दोन्ही टँकर दिसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील 45 लाख रुपये किमतीचे दोन्ही टँकर कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून ताब्यात घेतले. फरार आरोपी (Fugitive accused) जोबनप्रितसिंग तरलोकसिंग यास लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com