केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम

केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम

बोरद Bored ता.तळोदा ।। वार्ताहर

तळवे (Talwe) ता.तळोदा या जळगावच्या धर्तीवर (lines of Jalgaon) मोठया प्रमाणावर केळीची लागवड (Banana cultivation) होत आहे. जिल्हयात केळीचे सर्वाधिक उत्पन्न (Highest yield of banana)घेण्यात तळवे हे गाव प्रथम (village is number one) क्रमांकावर आहे. येथील शेतकरी (farmer) उत्पादन वाढीबाबत (Regarding production growth) माहिती घेत असतात व निर्यातक्षम उत्पादन (exportable product) घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात त्यामुळे ते यशस्वीही होत आहेत.

केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम
महिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

तळोदा तालुक्यातील तळवे या गावी अनेक मोठमोठे शेतकरी विविध प्रयोग राबवून शेती करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढत असते. तळवे हे गावं 365.59 हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात वसलेले आहे. शेतीयोग्य जवळजवळ 3500 हेक्टर शेतजमीन या परिसरात आहे. या 3500 हेक्टर अंतर्गत मोठमोठया शेतकर्‍यांच्या शेतजमिनी असल्याने ते आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण पिक घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक प्रकारच्या केळीच्या जाती शेतात लागवडीसाठी आणल्या जातात. त्यामध्ये टिशू रोपांना अधिक महत्व दिले जाते.अर्थात केळीबाबत नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी राबविताना शेतकरी दिसून येतात. तसेच कांदेबाग या दोन टप्प्यात उत्पादन घेतले जाते.

केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम
PHOTOS # जखम डोक्याला, मलमपट्टी पायाला..!
केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम
वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी

केळी उत्पादनाबाबत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने जळगांव जिल्हा हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचधर्तीवर तळवे हे गावं तालुक्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे गाव म्हणून पाहिल्या क्रमांकवर आहे.

साधारणतः 500 ते 700 हेक्टर जमिनीत हे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल बोरद गावाचा क्रमांक येतो. परंतू व्यापारीदृष्ट्या तळवे परिसरातील केळीला निर्यातीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे.

केळीचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात तळवे गाव प्रथम
पाचशे निराधार, विधवा महिलांना साडीचा आहेर

येथील शेतकरी केळीबाबत विविध ठिकाणी भेटी देऊन उत्पादन वाढीबाबत माहिती घेत असतात व निर्यातक्षम उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात व त्यात ते यशस्वी ही होतात.

उत्तर भारतातील व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात.व गुणवत्तापूर्ण केळीला निर्यातीच्या दृष्टीने योग्य भाव देऊन खरेदीही करतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे उत्पादन चांगले असूनही भाव नसल्याने शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र आता परिस्थिती सुधारली आहे. शेतकरी जोमाने केळीचे उत्पादन घेत आहेत.

15 ते 20 हेक्टर शेतजमिनीत केळीचे उत्पादन घेतो. यासाठी काही क्षेत्र भाडेतत्त्वावर घेतो व अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. तळवे परिसरातील शेतजमीन केळीसाठी पोषक असल्याने उत्पादनही चांगले मिळते. परंतु व्यापारी मालाची प्रतही चांगली पाहतात आणि भाव देतांना हात आखडता घेतात. खतांचे दर व मजुरी वाढल्याने मालाच्या भावाबाबत तडजोड करणे नुकसानीचे ठरते.त्यामुळे व्यापार्‍यांनी योग्य भाव देऊन शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करावे जेणे करून व्यापारी व शेतकरी यांचा समतोल टिकून राहील.

- दशरथ पाटील केळी उत्पादक शेतकरी तळवे ता.तळोदा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com