जादुटोणा करुन महिलेस मारुन टाकल्याचा संशय

जादुटोणा करुन महिलेस मारुन टाकल्याचा संशय

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

महिलेला जादुटोणा (sorcery) करून मारून टाकल्याचा संशय घेवून महिलेला नायलोन दोरीने (Nylon rope) बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना डाबचा कुकरखाडीपाडा ता.अक्कलकुवा (Akkalkuva) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध मोलगी पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१० ऑक्टोबर रोजी चमारीबाई होमा पाडवी हिने मोकन्या खेमा वसावे याची बहिण बाबाई बोज्या पाडवी हिला जादुटोणा करुन मारुन टाकले असा संशय घेवून

हुवलाबाई मोकन्या वसावे, वंती खेमा वसावे, रायकीबाई दिवाल्या वसावे (सर्व रा. डाबचा कुकरखाडीपाडा ता.अक्कलकुवा) यांनी संमती दर्शवून चमारीबाई हिस वरील चौघांनी नायलोन दोरीने दोन्ही हात बांधून गावाच्या स्मशानभूमीत घेवून जावून स्मशानभुमीस हात लावून स्मशानभूमीस गोल चक्कर मारून शपथ घेण्यास भाग पाडले.

तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट, व आघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन या कायद्याचे उल्लंघन करून फिर्यादी महिलेस चौघांनी चमारीबाई यांना काठीने व नायलॉन दोरीने कमरेवर,

डाव्या पायावर, पाठीवर मारून दुखापत केली. याबाबत चमारीबाई यांनी दिलेल्य फिर्यादीनुसार मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com