औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम' स्पर्धा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम' स्पर्धा
USER

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्यातील शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (Industrial Training Institutes) नवीन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांचा (students) सहभाग वाढावा व त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम विद्यार्थ्याना उपलब्ध व्हावा. यादृष्टीने शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दि.१ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम' स्पर्धा
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

या स्पर्धेमध्ये भाग घेणारा प्रशिक्षणार्थी राज्यातील कोणत्याही शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेला अथवा प्रशिक्षण पुर्ण केलेला असावा. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वयाची अट नसून विद्यार्थ्याना https://docs.google.com/forms/d/e/1F­IpQLSc8SIdnqsFfJqdFVqw5dRDhQp­nxqo3E7DcdbLeWddEsUiYkg/viewform या लिंकवर फॉर्म भरणे आवश्यक राहील. स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यास शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम, अन्य उपयुक्त अभ्यासक्रम या अभ्यासक्रमासाठी भाग घेता येईल.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यानी त्यांच्या जवळच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा. या उपक्रमात विद्यार्थ्याना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करावे लागणार असून

उत्कृष्ट तीन विद्यार्थ्याना अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपये, व्दितीय तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक दोन हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देखील संस्थेच्यावतीन देण्यात येणार आहे. असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धुळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'सुचवा तुमच्या आवडीचे अभ्यासक्रम' स्पर्धा
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com