उपनगराध्या भाग्यश्री चौधरींनी दिली तळोदेकरांना वाढदिवसाची अनोखी भेट

वाढदिवसानिमित्त तळोद्याच्या उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम
उपनगराध्या भाग्यश्री चौधरींनी दिली तळोदेकरांना वाढदिवसाची अनोखी भेट

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

तळोदा (Taloda) येथील उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी (Deputy Mayor Bhagyashree Chaudhary) यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोई गल्ली, जोहरी गल्ली येथील पाण्याचा तीव्र प्रश्न लक्षात घेऊन स्वखर्चाने कुपनलिकेचे (Couponline) भूमिपूजन (Bhumi Pujan) केले. त्यांच्या प्रयत्नाने या भागाच्या पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील भोई गल्ली व जोहरी गल्ली या परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. पाण्यासाठी हे नागरिक इकडे तिकडे भटकंती करत होते. आपल्या परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून रहिवाश्यांनी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश चौधरी यांच्यापुढे व्यथा मांडली.

त्यांनी नागरिकांचे शिष्टमंडळ घेऊन उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्याशी चर्चा केली. त्यावर त्यांनी तातडीने कार्यवाही करत कूपनलिका करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता.

त्याचे औचित्य साधून उपनगराध्यक्षा चौधरी यांनी भोई गल्ली येथे स्वतःच्या खर्चातून भूमिपूजन केले.यावेळी नगरसेवक अमानोद्दीन शेख, कल्पेश चौधरी, हिरालाल भोई, किशोर कुंभार, तुषार जोहरी, हितेश तांबोळी, पंकज टवाळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान आपल्या परिसरातील तीव्र पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने तेथील नागरिकांनी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com