पुलाचा भराव वाहुन गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना

पुलाचा भराव वाहुन गेल्याने विद्यार्थ्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना

रविंद्र वळवी

मोलगी । Molgi

सातपुड्याच्या (Satpuda) अतिदुर्गम भागातील (remote areas) सरीचा गौरीखालपाडा (Gaurikhalpada of Surrey) येथील पुलाजवळील (bridge) भराव अतिवृष्टीमुळे वाहून (Washed away by heavy rains) गेल्याने विद्यार्थ्यांना (students) तसेच नागरिकांना पुलाअभावी (Lack of a bridge) अनेक समस्यांचा सामना (Dealing with problems) करावा लागत आहे.

सरीचा गौरीखालपाड्याला जोडणार्‍या पुलाच्या एका बाजूकडील भराव अतिवृष्टीत वाहून गेल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेत तसेच अंगणवाडीत जाणार्‍या येणार्‍या मुलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

मुलांना शाळेत व अंगणवाडीत नेतांना आणतांना पालक व अंगणवाडी मदतनीस यांना मुलांना पुलावरुन चढउतार करावे लागते. तसेच गरोदर माता व रुग्णांनादेखील भराव नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे या पुलाचा वाहून गेलेला भराव त्वरित दुरुस्त करावा यासाठी निवेदन दिले आहे.

मात्र, अद्यापपर्यंत या ठिकाणी भराव केला गेला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंगणवाडीत व शाळेत ये जा करणार्‍या बालकांना चढ-उतार करण्याची कसरत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com