शहादा, लोणखेडा, प्रकाशा येथे कडकडीत बंद

मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हे दाखल
शहादा, लोणखेडा, प्रकाशा येथे कडकडीत बंद

शहादा Shahada ता.प्र.-

श्रीराम नवमी (Shriram Navami) निमित्त शहाद्यात रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत (procession) पोलिसांनी (police) बँड वाजविण्यास मज्जाव (No band playing) करून तो जप्त केला. त्यामुळे भाविकांनी मिरवणूक स्थगित करीत ठिय्या आंदोलन केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ (Prohibition) आज शहादा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास शहादेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद (Strictly closed) पाळला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक आंदोलनही करण्यात आले. दरम्यान, शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात (Police escort deployed) करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार तळ ठोकून आहेत.

कोरोनाचे निर्बंध पूर्णतः उठविल्याने यंदा प्रशासनाने निवडणुकांना परवानगी दिली होती. त्यामुळे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्‍या शोभायात्रेची (Shobha Yatra) जय्यत तयारी करण्यात आल्याने प्रचंड उत्साह होता. या शोभायात्रेसाठी ढोलपथकासह बँड पथकही मागविण्यात आले होते. येथील चावडी चौकातून शोभायात्रेस सुरुवात होताच पोलिसांनी बँड वाजविण्यास (No band playing) मनाई करून बँड पथक ताब्यात घेतले. त्यामुळे राम भक्तांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला.

बँड पथक येईपर्यंत मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेत रामा भक्तांनी जागेवरच ठिय्या आंदोलन केले. (Sit-in agitation) पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाला यश आले नाही. त्यातून वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या या भूमिकेवर रामभक्तांनी संताप व्यक्त करीत निषेध केला. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ श्रीराम जन्मोत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आज शहादा बंदचे (Shahada Strictly closed) आवाहन केले होते.

या आवाहनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने चहा विक्रेत्यांपासून ते भाजीपाला भाजीपाला मार्केट बंद (closed) होते. त्यामुळे शहरात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील तणावाचे वातावरण पाहता पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बल, दंगा नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार (Upper Superintendent of Police Vijay Pawar) शहरात तळ ठोकून आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Stories

No stories found.