शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे खा.डॉ.हिना गावीत यांना निवेदन

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

प्रहार शिक्षक संघटनेने Prahar Teachers Association शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी Pending demands of teachers खासदार डॉ.हिना गावीत MP Dr. Hina Gavit यांची भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यानिवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेस होणे अपेक्षित असतांना नियमित जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन उशिरा होतात.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे विविध कर्जाचे हप्ते वेळेवर न भरु शकल्यामुळे नेहमीच आर्थिक भुर्दळ व मानसिक त्रास सहन करावा लागतो.वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर करण्यात यावा.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व डीसीपीएस धारकांना त्यांच्या डीसीपीएस कपातीचा सन 2008-09 ते सन 2020-21 पर्यंतचा हिशोब शासन हिस्सा आणि व्याजासह वर्षनिहाय मिळावा,.गणेश कौतिक पाटील प्राथमिक शिक्षक जि.प.शाळा करडे ता.तळोदा येथे दि .18 जलै 2017 पासून हजर होवुन देखील आजतागायत विना वेतन सेवा करीत आहेत. श्री. पाटील हे अपंग एकात्मिक योजनेतील 595 यादीतील शिक्षक असून सन 2008 युनिट तपशिल मधील त्यांच्याबरोबर विशेष शिक्षक कार्यरत असून नियमित पगार घेत आहेत.

92 वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक,शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली असून अद्याप शासनकडून प्रशिक्षित होण्यासाठी एकही संधी उपलब्ध करुन दिलेली नाही.पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांसाठी शासनाने एकस्तर वेतन लागु केलेले असून त्याचबरोबर या क्षेत्रात कार्यरत इतर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीबाबत सवलती देण्यात आलेल्या आहेत.

परंतु सध्या या शासन निर्णयातील केवळ एकस्तर वेतन प्रणाली लागु असून बदलीबाबत शासनाने जाहीर केलेल्या सवलतीचा उच्चार ऑनलाईन बदली धोरणात नसल्यामुळे या बदलीबाबतच्या सवलतींचा लाभ या आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मिळत नाही , जिल्हा परिषदेमध्ये कर्मचार्‍यांनी भविष्य निर्वाह निधी अग्रीम काढण्यासाठीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात सादर केले आहेत .

बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे भविष्य निर्वाह निधी अग्रीम प्रस्ताव मंजुर केला जात नसल्याचे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडून सांगण्यात येत असते.तरी सदर मागण्यांबाबत आपण संबंधित विभागाला आदेश देवून मार्गी लावाव्यात अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली.

खा.डॉ.हिना गावीत यांनी सदर मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत,जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई ,जिल्हा संघटक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com