तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक मंडळास राज्यस्तरीय पुरस्कार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण
तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक मंडळास राज्यस्तरीय पुरस्कार

तळोदा | ता.प्र.- TALODA

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागामार्फत (Maharashtra State Department of Cultural Affairs) तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक मंडळास (Sri Kshatriya Mali Navayuvak Mandal) आज दि.१८ रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय पुरस्कार (State level award) सांस्कृतिक कार्यमंत्री सूधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते प्रदान (provided) करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना जिल्हा व राज्यस्तरीय पूरस्कार जाहीर करण्यात आले होते. येथील क्षत्रिय माळी नवयूवक मंडळास राज्यात अठरावा क्रमांक आला होता. त्याचे बक्षीस वितरण आज मुंबईत करण्यात आले.

यावेळी मंडळांचे अध्यक्ष श्रीराम मगरे, उपाध्यक्ष राजू काळे, सचिव रत्नाकर शेंडे, नगरसेवक जितेंद्र माळी, मुकेश माळी, योगेश पवार, सुरेश टवाळे, डॉ.प्रा.महेंद्र माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com