अमरावती येथे राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धा

नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे संघ स्पर्धेसाठी रवाना
अमरावती येथे राज्यस्तरीय एकेएसपीएल क्रिकेट स्पर्धा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

सावकलाल समाज मंडळ अमरावती व युवाशक्ती सावकलाल कलाल समाज सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय ‘एकेएसपीएल’ (AKSPL) फिरते चषक क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे दोन संघ आज दि.६ जानेवारी रोजी अमरावतीला रवाना झाले.

सावकलाल समाज मंडळ अमरावती व युवाशक्ती सावकलाल कलाल समाज सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय ‘एकेएसपीएल’ फिरते चषक क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे.

अमरावती येथे उद्या दि. ७ जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सदर सामने दि.७ ते ९ जानेवारीदरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी येणार्‍या सर्व संघांमधील खेळाडूंची राहण्याची नास्त्याची व जेवणाची व्यवस्था अमरावती समितीतर्फे करण्यात आली आहे.

स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये व फिरता चषक, व्दितीय बक्षीस ३१ हजार रुपये व फिरता चषक, तृतीय बक्षीस २१ हजार रुपये देण्यात येणार आहे.

महिलांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस २१ हजार व फिरता चषक, व्दितीय बक्षीस ११ हजार रुपये व फिरता चषक, तृतीय बक्षीस ७ हजार रुपये देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय फिरता चषक सामन्यांचे हे प्रथम वर्ष असून यामध्ये जो संघ विजयी होईल, तो संघ पुढील वर्षी तोच चषक अमरावतीला सोबत घेऊन येईल. या सामन्यांना सर्व जिल्ह्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

या स्पर्धेसाठी नंदुरबार व तळोदा येथील कलाल समाजाचे दोन संघ आज सकाळी ७.३० वाजता अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने अमरावतीकडे रवाना झाले.

या संघांमध्ये अनिकेत कलाल, जितेंद्र कलाल, पराग बागुल, गणेश कलाल, हर्ष किनगावकर, भुपेंद्र कलाल, लकेश कलाल, कुशल कलाल, रोहित सोनवणे, रोहित कलाल, चिरायु सोनवणे, उमेश सोनवणे, विलास कलाल, महेश कलाल, चंद्रेश कलाल, मृगेश कलाल, पवन सोनवणे,

अभय जावरे, राहूल कलाल, मयुर कलाल, गिरीष कलाल, हितेश कलाल, गौरेश कलाल, सागर कलाल, अक्षय कलाल, उमेश कलाल, राहूल सूर्यवंशी, संजय कलाल, कुणाल कलाल, सिद्धार्थ कलाल, मयुर संजयसा कलाल, यश कलाल यांचा समावेश आहे.

या दोन्ही संघांचे नेतृत्व तळोदा कलाल समाजाचे अध्यक्ष संजय कलाल हे करत असून खेळाडूंचा सर्व खर्चदेखील त्यांनीच केला आहे.

नंदुरबार कलाल समाज क्रिकेट टिमचे कप्तान महेश कलाल, उपकप्तान राहूल कलाल तर तळोदा कलाल समाज क्रिकेट संघाचे कप्तान पराग बागूल, उपकप्तान जितेंद्र कलाल हे आहेत.

या दोन्ही संघांचे नंदुरबार कलाल समाजातर्फे स्वागत करण्यात येवून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निश्‍चल गिरनार, रुपेश गिरनार, संदीप गिरनार, राकेश कलाल आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com