नंदुरबार पालिकेच्या 81 कोटीच्या रस्ते प्रकल्पास राज्य शासनाची मंजूरी

नंदुरबार
नंदुरबार

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी-

येथील नगरपालिकेच्या (municipality) 80 कोटी 95 लाख रुपये किमतीच्या रस्ते प्रकल्पाला (Road project) राज्य शासनाने (State Govt) मंजूरी दिली आहे. याबाबत नगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजूरी(Approval) मिळाली असून राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय दि.29 मार्च रोजी काढला आहे.

राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नंदुरबार नगरपरिषद रस्ते विकास प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत संदर्भाधीन क्र. 6 च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दि.9 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या रस्ते विकास प्रकल्पास संदर्भाधीन शासन निर्णयातील अटी व तरतूदीच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून शासन निर्णयाद्वारे मंजूरी दिली आहे.

या प्रकल्पात तळोदा रोडवरील स.न. 130 ते पुर्वेस शहादा रोडवरील स.न. 208 पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, स.न. 215 पासून उत्तरेस स.न. 219 तेथून पश्चिस स.न. 220 वळण रस्त्या पावेतो रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, स.न. 236 ते स.न. 216 पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, स.नं. 243 ते स.नं. 229 पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, डायव्हर्शन रोड वरील स.नं. 234, स.नं. 236, स.नं. 237 ते पुढे भालेर रस्त्या पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. नर्मदा विकास विभाग कार्यालयापासून पुर्वेस ट्रक टर्मिनल ते पुढे डायव्हर्शन रोड पावेतो रस्ता ट्रिमीक्स पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे, न.पा. शेल्टर होमपासून दक्षिणेस डायव्हर्शन रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, स.नं. 297 डी.पी. रोड ते पुर्वेस स.नं. 297 -अ, 320, 319 ते पुढे धुळे रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, दंडपाणेश्वर मंदिर (वळण रस्ता) ते उत्तरेस न.पा. स्मशानभुमी रोड ते मुख्य रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, नवापूर रस्त्यावरील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कंपाऊंडंला वळण घेवून पुर्वेस न्यायाधिशांच्या घराजवळील मुख्य रस्त्या पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे.

नवापूर रोड स.नं. 414 पासून ते दक्षिणेस नंदुरबार मध्यम प्रकल्प ऑफिस पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, साक्री रोड वरील भाऊ पेट्रोल पंप ते पश्चिमेस समाज कल्याण ऑफीस टोकर तलाव रोड पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, नळवा रोड वरील नरेंद्र जैन यांच्या घरापासून ते पश्चिमेस एम.एल. टाऊन पावेतो रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे अशा एकुण 13 रस्त्यांसाठी 80 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी राज्य शासन 75 टक्के अर्थात 60 कोटी 71 लाख 25 हजार रुपये तर नगरपालिकेचा 25 टक्के वाटा राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com