स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे सॅलरी पॅकेज अंतर्गत क्लेमचे वारसाला मिळाले तब्बल 30 लाख

नंदुरबार येथे आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत मेळाव्याचे आयोजन
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे सॅलरी पॅकेज अंतर्गत क्लेमचे वारसाला मिळाले तब्बल 30 लाख

नंदुरबार । Nandurbar प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) नंदुरबार शाखेत पगार खाते (Salary account) असलेल्या मृत कर्मचार्‍याच्या (deceased employee) नातलगांना (relatives) 30 लाखाच्या क्लेम रकमेचे (Claim amount) वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कै.चरणसिंग धुड्या गावित यांचे दुदैवाने दि.2 डिसेंबर 2021 रोजी दोंडाईचा- नंदुरबार रोडवर अपघाती निधन झाले. चरणसिंग हे रेल्वे पोलीस फोर्स दोंडाईचा येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटूंबिय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले असता स्टेट बँकेतील अधिकार्‍यांनी हे खाते सॅलरी पॅकेज (salary package) अंतर्गत असल्याने त्याला विमा संरक्षण असते, अशी माहिती त्यांना दिली व त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्या वारसांनी कागदपत्रे आणली असता त्यांना सॅलरी पॅकेज या योजनेअंतर्गत तीस लाख रूपये विमा संरक्षक (Insurance protection) रक्कम दि .27 मे रोजी त्यांच्या पत्नी कल्पनाबाई चरणसिंग गावीत यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.

स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत कुठलेही शुल्क आकारले जात नाही. या आधीही बँकेने वेगवेगळ्या योजना ग्राहकांना सांगून त्यांचे खाते व त्यांचा फायदा कसा होईल, या बाबतीत मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून जनजागृती केली आहे. दि. 8 जून रोजी नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रमात या रकमेच्या धनादेशाचे वितरण नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, आ.डॉ. विजयकुमार गावीत व स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर सुरजीतकुमार साह यांचे हस्ते करण्यात आले.

आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात स्टेट बँकेच्या इतरही उपक्रमांची, योजनांची माहीती देण्यात आली. यावेळी अग्रणी बँकेचे जयंत देशपांडे, नाबार्डचे सहा. महाप्रबंधक प्रमोद पाटील, मुख्य प्रबंधक प्रकाश रणधीर, स्टेट बँक बँक नंदुरबारचे मुख्य प्रबंधक राजेश मिश्रा मान्यवर उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com