नवापूर येथे एस.टी.बसची स्कूटरला धडक ; महिला ठार

नवापूर येथे एस.टी.बसची स्कूटरला धडक ; महिला ठार

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

नवापूर (Navapur) शहरातील डीजी अग्रवाल स्कूल जवळ महामार्गावरील खड्डे चुकविण्याचा नादात (s t bus) बसने स्कुटरला (scooter) धडक दिल्याने भीषण (accident) अपघात होवून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

सुरतहुन मोटारसायकल (क्र. जी.जे. १९ एआर ८६४४) ने पती पत्नी आपल्या गावी जात होते. नवापुरजवळील डी.जी अग्रवाल समोर येताच खड्डा चुकविण्याच्या नादात शेजारी चाललेल्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली.

त्यात मोटार सायकलवरील महिला फेकली जाऊन बसचा मागील टायरमध्ये आल्याने तिचा जागीच ठार झाली. घटनास्थळी नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ व पोलीसांनी धाव घेत जखमीना मदत केली.

साक्री डेपोची वापी-धुळे बस (क्र.एम.एच. २० पी.ए.३४२५) भरधाव वेगात येत होती. यात. स्कूटरवरील पाटील दांपत्य शिंदखेडा तालुक्यातील भाडणे येथे कानबाई मातेच्या रोटसाठी जात असतांना अपघात झाला. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com