..म्हणून नंदुरबारला दोन दिवसाआड पााणीपुरवठा

 ..म्हणून नंदुरबारला दोन दिवसाआड पााणीपुरवठा
Water cut in the cityNashikites may face water cut

नंदुरबार । Nandurbar प्रतिनिधी

यावर्षी पाऊस कमी (Less rain) पडल्याने शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणार्‍या विरचक धरणात (Virachak Dam) यावर्षी 50 टक्के देखील पाणीसाठा शिल्लक नाही. (No water reserves) उन्हाळयात पाण्याची टंंचाई (Water scarcity) भासू नये यासाठी नंदुरबार पालिकेकडून (Municipality) दोन दिवसाआड (two days) पाणी पुरवठा करण्याचा निर्णय (Decision) घेतला आहे. मार्च ते जून महिन्यात पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ज्यांनी कोरोनाच्या काळात व्यवसाय केला त्यांनी पालिकेला नियोजन शिकवू नये, असेही त्यांनी सांगितले.

श्री.रघुवंशी म्हणाले, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विरचक धरणात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागू नये यासाठी आतापासूनच नंदुरबार पालिकेकडून नियोजन करण्यात येत आहे. हिवाळयात पाण्याची मागणी कमी असल्याने सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची अधिक गरज असल्याने त्यावेळी पुन्हा एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणी पातळी आणखी खालावणार आहे. यामुळे पुढील संकट डोळ्यासमोर ठेवूनच पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.

नंदुरबार पालिकेत दुसरे काहीही आरोप करण्यासारखे घडत नसल्याने विरोधकांकडून मोकाट गुरे आणि कुत्र्यांवरुन राजकारण केले जात आहे. लॉकडाऊनमध्ये काहींनी व्यवसाय केला असून पैसे कमविले. रेमडेसिवीरची तस्करी करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. यामुळे ज्यांनी कोरोनात व्यवसाय केला त्यांनी नंदुरबार पालिकेला नियोजन शिकवू नये, असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com