राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे २३ मार्च ते २५ एप्रिलदरम्यान स्नेहमिलन यात्रा

जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे २३ मार्च ते २५ एप्रिलदरम्यान स्नेहमिलन यात्रा

नंदुरबार | दि.२१| प्रतिनिधी NANDURBAR

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे (Nationalist Congress Party) दि.२३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान जिल्हा परिषदेच्या ५६ गटात राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा (Snehmilan Yatra) आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन (Organization) करण्यासह राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांचेही मनोमिलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे (District President Dr. Abhijeet More) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ.अभिजीत मोरे (Dr. Abhijeet More) म्हणाले की, दि.२३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्नेहमिलन यात्रेचे (Snehmilan Yatra)आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत प्रत्येक गटातील राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या जुन्या कार्यकर्त्यांसह नव्या कार्यकर्त्यांशी संवाद (Dialog) साधला जाणार आहे.

तसेच विविध विकास कामे, नियोजीत विकास कामांसह परिसरातील समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून नविन कार्यकर्त्यांची गाठ जुळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पार्टीचे (Nationalist Congress Party) गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ५६ गटात फिरून सक्रीय सहभागी करण्याचे काम यावेळी करण्यात येणार आहे. परंतु हे काम करीत असतांना राष्ट्रवादीच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सुत्रानुसार प्रत्येक गटात पक्षविरहीत बैठकांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीत कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता सदस्य अथवा पदाधिकारी असो, त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न राहणार आहोत. सध्याच्या काळात तरूणांचा (youth) मनात काही पक्ष जातीवात, पंथवाद भिनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

त्या तरूणांचेही या यात्रेनिमित्त उद्बोधन करून तरूणांना राष्ट्रवादाकडे (Nationalism) वळविण्यासाठी या यात्रेतून प्रयत्न करणार आहोत. दि.२३ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान राष्ट्रवादी स्नेहमिलन (Snehmilan Yatra) यात्रेत नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी केले आहे.

असा असेल कार्यक्रम

नंदुरबार तालुका- खोंडामळी गट, कोपर्ली गट दि.२३ मार्च, रनाळा, मांडळ गट दि.२४ मार्च, आष्टे, नांदर्खे गट दि.२५ मार्च, पातोंडा, कोळदा गट दि.२६ मार्च, धानोरा, कोठली गट दि.२९ मार्च. शहादा तालुका- कुढावद, पाडळदा गट दि. ३० मार्च, प्रकाशा, सारंगखेडा गट दि.३१ मार्च, लोणखेडा, मोहिदे गट दि.१ एप्रिल, कहाटुळ, वडाळी गट दि.२ एप्रिल, कन्साई, म्हसावद गट दि.३ एप्रिल, सुलतानपूर खेडदिगर गट दि.४ एप्रिल, चांदसैली, मंदाणा गट दि.५ एप्रिल. अक्कलकुवा तालुका- अक्कलकुवा, गंगापूर गट दि.७ एप्रिल, रायसिंगपुर, खापर गट दि.८ एप्रिल, होराफळी, मोरंबा गट दि.९ एप्रिल, भांग्रापाणी, वेली गट दि.१० एप्रिल, भगदरी, पिंपळखुटा दि.११ एप्रिल. या पध्दतीने राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा (Snehmilan Yatra) आयोजित करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com